HBD Salman Khan : आखा बॉलिवूड एक तरफ और सलमान खान एक तरफ; भाईजानची जंगी बर्थडे पार्टी, सेलिब्रिटी ते क्रिकेटपटू सर्वांनी लावली हजेरी

Salman Khan's 60th Birthday Bash : बॉलिवूडचा भाईजान सलमान खानने साठीत पदार्पण केले आहे. त्याच्या बर्थडे पार्टीत बॉलिवूड सेलिब्रिटी, क्रिकेटपटू पाहायला मिळाले.
Salman Khan's 60th Birthday Bash
HBD Salman Khan saam tv
Published On
Summary

आज बॉलिवूडचा भाईजान सलमान खानचा वाढदिवस आहे.

सलमान खान आज 60 वर्षांचा झाला आहे.

सलमान खानच्या बर्थडे पार्टी बॉलिवूड सेलिब्रिटी ते क्रिकेटपटू आले होते.

बॉलिवूडचा भाईजान सलमान खान (Salman Khan's 60th Birthday Bash ) आज (27 डिसेंबर) 60 वर्षांचा झाला आहे. खूप दिवसांपासून सलमानच्या वाढदिवसाची चर्चा सोशल मीडियावर पाहायला मिळाली. भाईजानच्या वाढदिवसाचे रात्री पनवेलच्या फार्महाऊसवर जंगी सेलीब्रेशन झाले. या पार्टीत बॉलिवूड सेलिब्रिटी ते क्रिकेटपटू सर्वांनी हजेरी लावली. बर्थडे पार्टीचे व्हिडीओ आणि फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

सलमान खानच्या वाढदिवसानिमित्त त्याची सुरक्षा वाढवण्यात आली आहे. सलमान खान स्वॅगमध्ये आपल्या वाढदिवसाचा केक कापताना दिसत आहे. त्यांने कॅज्यूल काळ्या रंगाचे टी शर्ट घातले आहे. 60 व्या वर्षी देखील भाईजान फिट आणि हँडसम दिसत आहे. सध्या सलमान खानवर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. सलमानचा जगभरात चाहता वर्ग आहे.

सलमानच्या बर्थडे पार्टीला कोण कोण आलं?

सलमान खानने आपल्या 60 व्या बर्थडेची पार्टी पनवेल येथे ठेवली होती. कुटुंब, मित्रमंडळी, बॉलिवूडला त्यांने आमंत्रण दिले होते. ज्यात क्रिकेटपटू महेंद्रसिंग धोनी, देशमुखांची सून जिनिलीया, हुमा कुरेशी, रणदीप हुडा, वरुण शर्मा, संगीता बिजलानी, सोहेल खान, रकुल प्रीत सिंह, मनीष पॉल , झीशान सिद्दीकी, मिका सिंग असे अनेक कलाकार पाहायला मिळाले. संगीता बिजलानी ही सलमानची एक्स गर्लफ्रेंड होती.

आगामी चित्रपट

सलमान खान सध्या त्याचा आगामी चित्रपट 'बॅटल ऑफ गलवान' च्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. 'बॅटल ऑफ गलवान' चित्रपटात भारतातील एका युद्धाची कहाणी दाखवण्यात येणार आहे. लडाखच्या गलवान व्हॅली घडलेला हा संघर्ष पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत. 'बॅटल ऑफ गलवान' ही कहाणी जून 2020 रोजी गलवान खोऱ्यात भारतीय आणि चीनी सैन्यांमध्ये झालेल्या हिंसक संघर्षाची आहे. अलिकडेच त्यांचा 'सिकंदर' चित्रपट रिलीज झाला आहे. चाहते भाईजानच्या चित्रपटाची उत्सुकतेने वाट पाहत आहे.

Salman Khan's 60th Birthday Bash
Mahima Chaudhry : आणखी एक स्टारकिड बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार; १८ व्या वर्षी चित्रपटात झळकणार? सौंदर्यावर चाहते फिदा

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com