Rashmika-Vijay Video Saam tv
मनोरंजन बातम्या

Rashmika-Vijay Video : हातात हात अन् चाहत्यांना दिलं फ्लाइंग किस, रश्मिका-विजय लग्नानंतर पहिल्यांदाच स्पॉट

Rashmika Mandanna- Vijay Deverakonda Wedding : साऊथ कपल रश्मिका आणि विजय अखेर लग्न बंधनात अडकले आहेत. नुकताच त्यांचा एक व्हिडीओ समोर आला आहे. ज्यात दोघे लग्नानंतर एकत्र स्पॉट झालेले दिसत आहे.

Shreya Maskar

रश्मिका मंदान्ना आणि विजय देवरकोंडा 26 फेब्रुवारीला लग्न बंधनात अडकले.

लग्नानंतर रश्मिका-विजय पहिल्यांदा एकत्र स्पॉट झाले.

रश्मिका-विजय उदयपूरच्या विमानतळावर स्पॉट झाले आहेत.

'विरोश' (VIROSH) ने 26 फेब्रुवारी 2026 ला लग्नगाठ बांधली. सध्या सर्वत्र रश्मिका मंदाना आणि विजय देवरकोंडा यांच्या लग्नाची चर्चा पाहायला मिळत आहे. उदयपूर येथीस 'आयटीसी मेमेंटोस' या लग्जरी हॉटेलमध्ये त्यांचा शाही विवाह सोहळा पार पडला. रश्मिका मंदाना आणि विजय देवरकोंडाने तेलुगू हिंदू आण कोडावा अशा दोन वेगवेगळ्या पद्धतीने लग्न केले.

सध्या सोशल मीडियावर फक्त रश्मिका-विजयच्या लग्नाचे फोटो आणि व्हिडीओ पाहायला मिळत आहे. अशात त्यांचा लग्नानंतरच पहिला व्हिडीओ समोर आला आहे. ज्याने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. व्हिडीओत रश्मिका मंदाना आणि विजय देवरकोंडाचा रोमँटिक अंदाज पाहायला मिळत आहे.

व्हायरल व्हिडीओ

रश्मिका मंदान्ना आणि विजय देवरकोंडा उदयपूर विमानतळावर लग्नानंतर पहिल्यांदा स्पॉट झाले. त्यांना पाहून चाहत्यांना प्रचंड आनंद झाल्याचे पाहायला मिळाले. तसेच पहिल्यांदाच एकत्र दिसल्यामुळे रश्मिका-विजय देखील खूप खुश पाहायला मिळाले. रश्मिका-विजय हातात हात घालून मीडियासमोर आले. त्यानंतर दोघांनी मिठी मारली. त्यानंतर रश्मिका-विजयने हात जोडून सर्वांना नमस्कार केला. त्यानंतर चाहत्यांना दोघांनी फ्लाइंग किस दिली. रश्मिका आणि विजय आनंदी असून खूप स्माइल करत होते.

एअरपोर्टवर नव्या नवरीच्या लूकने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. रश्मिकाच्या चेहऱ्यावर नव्या नवरीचा ग्लो दिसत होता. तिने सुंदर लाल रंगाचा पारंपरिक पंजाबी ड्रेस परिधान केला होता. मोकळे केस, मिनिमल मेकअप, साज श्रृंगार केला होता. भांगेमध्ये कुंकू भरले होते. नवीन नवरी खूपच सुंदर दिसत होती. तर विजयने विजयने ऑफ व्हाइट रंगाचा को-ऑर्ड सेट घातला होता. डोळ्यावर गॉगल लावला होता. त्यांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. यावर चाहते कमेंट्सचा वर्षाव करताना दिसत आहे.

रश्मिका मंदाना आणि विजय देवराकोंडा यांनी ऑक्टोबर 2025 मध्ये हैदराबादमध्ये साखरपुडा उरकला. लग्नाचे रिसेप्शन 4 मार्चला थाटामाटात पार पडणार आहे. रिसेप्शन दोन्ही हैदराबादमध्ये होणार आहे. लग्न सोहळा जवळचे नातेवाईक, कुटुंब आणि जवळच्या मित्रमंडळींच्या उपस्थितीत पार पडला. रश्मिका मंदाना आणि विजय देवरकोंडा यांनी 2018 ला रिलीज झालेल्या 'गीता गोविंदम' आणि 2019 साली 'डियर कॉमरेड' या दोन चित्रपटांमध्ये काम केले आहे. चाहते आता दोघांना पुन्हा एकदा एकत्र पाहायला उत्सुक आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

आरक्षणाचे संरक्षण व्हावं, शिक्षण प्रत्येक घटकापर्यंत पोहोचावं : सलीम सारंग

साकीनाका दुर्घटना प्रकरण; मुंबईकर जीवानं गेला, आमदार म्हणतात कट केला

Badlapur accident: मुलासोबत टिटवाळा गणपती दर्शनाला गेली, परतताना खड्ड्यात दुचाकी आदळली; भीषण अपघातात आईचा मृत्यू

Sakinaka Manhole: बीएमसीचे अधिकारी, मुंबईकरांचे मारेकरी? अधिकाऱ्यांना घरी पाठवा

Friday Horoscope: कामात संधी, प्रेमाची कबूली; या ६ राशीच्या लोकांना मिळणार गुड न्यूज, वाचा शुक्रवारचं राशीभविष्य

SCROLL FOR NEXT