Siddhi Hande
पंजाबी स्टाईल राजमा चावल तुम्ही घरीच बनवू शकतात. त्यासाठी ही रेसिपी नक्की ट्राय करा.
राजमा, तांदूळ, पाणी, तेल, टॉमेटो, कांदा, लसूण-आलं, गरम मसाला, हळद, लाल तिखट, मीठ, जिरे-धने पावडर, वेलची, हिरवी मिरची
सर्वात आधी तुम्हाला राजमा हा रात्रभर भिजत ठेवायचा आहे. त्यानंतर दुसऱ्या दिवशी शिजवायचा आहे.
यानंतर एका पातेल्यात पाणी टाका. पाण्याला चांगली उकळी येऊ द्या. उकळी आल्यानंतर त्यात तांदूळ टाका.
पाण्यात खडा मसाला, तमालपत्र टाका. तांदूळ शिजल्यानंतर त्यातील पाणी काढून घ्या.
राजमा बनवण्यासाठी सर्वात आधी पॅनमध्ये तेल गरम करा. त्यात जिरे, धणे, हिरवी मिरची, लसूण, आलं, कांदा आणि टॉमेटो परतून घ्या.हे मिश्रण बराच वेळ परतून घ्या.
यानंतर त्यात हळद, लाल तिखट आणि गरम मसाला टाका.
यामध्ये शिजवलेला राजमा टाका. यावर शेवटी गरम मसाला टाका. जेणेकरुन याची चव रेस्टॉरंट स्टाईल लागेल.
यानंतर एका बाजूला राजमा आणि चावल घेऊ मिक्स करुन खा. याची टेस्ट खूप मस्त लागेल.
Next: घरच्या घरी बनवा हेल्दी अन् टेस्टी पालक ओट्स टिक्की, वाचा सोपी रेसिपी