ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
पालत ही अत्यंत पोष्टिक आणि गुणधर्म असलेली पालेभाजी आहे. पालक हे शरीरीसाठी अत्यंत फायदेशीर मानले जाते. तसेच पालक पासून अनेक प्रकारच्या डिश बनवता येतात.
पालक, ओट्स, हिरवी मिरची, आले, मीठ, तेल आणि घरगुती मसाले इत्यादी साहित्य लागते.
सर्वात आधी पालक स्वच्छ धुवून घ्या आणि उकडत ठेवा. नंतर उकडलेल्या पालकाला बारीक कापून घ्या. त्यात मिक्सरमध्ये बारीक केलेले ओट्स चांगल्या प्रकारे मिक्स करुन घ्या.
आता त्यात हिरवी मिरची, आले, मीठ आणि हलकेसे मसाले घालून मिक्स करुन मिश्रण तयार करा.
तयार केलेल्या मिश्रणा पासून टिक्की बनवून गरम तेलात मंद आचेवर तळून घ्या. तुमची पालक ओट्स टिक्की तयार आहे.
पालक-ओट्स टिक्कीमध्ये प्रोटिन आणि फायबर भरपूर प्रमाणात असते आणि ते पोट बराच काळ भरलेले ठेवते.
ज्यांना वजन कमी करायचे आहे आणि तंदुरुस्त जीवनशैली जगायची आहे त्यांच्यासाठी ही रेसिपी बेस्ट आहे.