Rashmika-Vijay Net Worth : रश्मिका-विजयचा उदयपूरमध्ये शाही थाटात लग्न सोहळा संपन्न; कोट्यवधींचा खर्च, 'विरोश'ची एकूण संपत्ती किती?

Rashmika Mandanna-Vijay Deverakonda Wedding : साऊथची प्रसिद्ध जोडी रश्मिका मंदान्ना आणि विजय देवरकोंडा नुकतेच लग्न बंधनात अडकले आहे. त्यांचा शाही विवाह सोहळा उदयपूरमध्ये थाटात पार पडला. त्यांची एकूण संपत्ती किती जाणून घेऊयात.
Rashmika Mandanna-Vijay Deverakonda Wedding
Rashmika-Vijay Net Worthsaam tv
Published On
Summary

रश्मिका मंदान्ना आणि विजय देवरकोंडा लग्न बंधनात अडकले.

लग्नासाठी कोट्यवधींचा खर्च करण्यात आला.

रश्मिका मंदान्ना आणि विजय देवरकोंडा ही साउथ इंडस्ट्रीतील प्रसिद्ध जोडी आहे.

साऊथची सुपरहिट जोडी रश्मिका मंदान्ना आणि विजय देवरकोंडा 26 फेब्रुवारी 2026 ला लग्न बंधनात अडकले. त्यांचा शाही विवाह सोहळा उदयपूरमध्ये थाटामाटात पार पडला. 'विरोश' (VIROSH) प्रेक्षकांची आवडती जोडी आहे. लग्नासाठी रश्मिका-विजयने लग्जरी हॉटेल बुक केले.

उदयपूर जवळील 'आयटीसी मेमेंटोस' ( Mementos by ITC Hotels Ekaaya ) या लग्जरी हॉटेलमध्ये त्यांचा लग्न सोहळा पार पडला. मिळालेल्या माहितीनुसार, या लग्जरी हॉटेलमध्ये सर्वसाधारणपणे येथे 30 हजारापासून 91 हजारापर्यंतचे व्हिला पाहायला मिळतात. तसेच लग्नात शाही थाट पाहता, लग्नात कोट्यवधींचा खर्च करण्यात आला आहे. रश्मिका मंदान्ना आणि विजय देवरकोंडा यांच्यात सर्वात जास्त श्रीमंत कोण जाणून घेऊयात.

रश्मिका मंदान्नाची संपत्ती

रश्मिका चित्रपट, ब्रँड (दागिने, ब्युटी प्रोडक्ट), गुंतवणूक, व्यवसाय यांच्यातून पैसा कमावते. तिने साऊथसोबत बॉलिवूड इंडस्ट्री देखील गाजवली आहे. ती एका चित्रपटासाठी जवळपास 4-8 कोटी रुपये मानधन घेते. 'पुष्पा' च्या यशानंतर तिच्या मानधनात वाढ झाली असल्याचे बोले जाते. आता ती एका प्रोजेक्टसाठी 10 कोटींच्या आसपास पैसे घेते. तिने रिअल इस्टेटमध्ये देखील गुंतवणूक केली आहे. तिच्या बेंगळुरूमधील घराची किंमत सुमारे 8 कोटी रुपये आहे. तसेच तिच्या लक्झरी कार कलेक्शनमध्ये ऑडी क्यू३, रेंज रोव्हर स्पोर्ट, मर्सिडीज-बेंझ सी-क्लास यांचा समावेश होतो. मिडिया रिपोर्टनुसार, रश्मिका मंदान्नाची संपत्ती अंदाजे 66 कोटी रुपये आहे.

विजय देवरकोंडाची संपत्ती

विजय देवरकोंडा टॉलिवूडमधील प्रसिद्ध चेहरा आहे. तो एका चित्रपटासाठी 12 कोटी ते 15 कोटी दरम्यान मानधन घेतो. ब्रँड एंडोर्समेंटमधूनही तो मोठ्या प्रमाणात कमाई करतो, ज्यामध्ये अनेकदा तो 1 कोटींपेक्षा जास्त कमावतो. तो इंस्टाग्राम पोस्टसाठी सुमारे 40 लाख रुपये घेतो. विजय देवरकोंडाचे हैदराबादमधील बंगला सुमारे 15 कोटी रुपयांचे आहे. तसेच त्यांच्याकडे बीएमडब्ल्यू ५ सिरीज, फोर्ड मस्टँग, व्होल्वो एक्ससी९०, मर्सिडीज-बेंझ जीएलएस आणि रेंज रोव्हर यांसारख्या लग्जरी कार आहेत. मिडिया रिपोर्टनुसार, विजय देवरकोंडाचे नेटवर्थ अंदाजे 66 कोटी ते 70 कोटी रुपये आहे.

'विरोश' ची एकूण संपत्ती

रश्मिका मंदाना आणि विजय देवराकोंडा यांनी ऑक्टोबर 2025 मध्ये हैदराबादमध्ये साखरपुडा उरकला. त्यांच्या लग्नाचे रिसेप्शन 4 मार्चला थाटामाटात हैदराबादमध्ये पार पडणार आहे. रश्मिका मंदाना आणि विजय देवरकोंडा यांनी 2018 ला रिलीज झालेल्या 'गीता गोविंदम' आणि 2019 साली 'डियर कॉमरेड' या दोन चित्रपटांमध्ये काम केले आहे.मिडिया रिपोर्टनुसार, रश्मिका मंदान्ना आणि विजय देवरकोंडाची एकूण संपत्ती मिळून जवळपास 130 कोटी ते 136 कोटी रुपये आहे.

Rashmika Mandanna-Vijay Deverakonda Wedding
Rashmika-Vijay Wedding : गीता गोविंदमचं शाही लग्न! रश्मिका-विजयनं बुक केलं सर्वात महागडं हॉटेल, एका रात्रीचं भाडं वाचून थक्क व्हाल

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com