Rashmika-Vijay Wedding : गीता गोविंदमचं शाही लग्न! रश्मिका-विजयनं बुक केलं सर्वात महागडं हॉटेल, एका रात्रीचं भाडं वाचून थक्क व्हाल

Rashmika-Vijay Wedding Venue And Cost : उदयपूरमध्ये रश्मिका-विजयचा शाही विवाह सोहळा पार पडणार आहे. लग्नासाठी त्यांनी लग्जरी हॉटेल बुक केले आहे. ज्याची किंमत जाणून घेऊयात.
Rashmika-Vijay Wedding Venue And Cost
Rashmika-Vijay Weddingsaam tv
Published On
Summary

रश्मिका मंदाना आणि विजय देवरकोंडा उदयपूरमध्ये लग्न करणार आहेत.

उदयपूरमधील सर्वात महागडे हॉटेल त्यांनी लग्नासाठी बुक केले आहे.

रश्मिका-विजय 26 फेब्रुवारीला लग्नबंधनात अडकणार आहेत.

'विरोश' (VIROSH) च्या घरी लगीन घाई पाहायला मिळत आहे. साऊथ इंडस्ट्रीचे पावर कपल रश्मिका मंदाना आणि विजय देवरकोंडा लवकरच लग्न बंधनात अडकणार आहे. सर्वत्र त्यांच्या लग्नाची चर्चा पाहायला मिळत आहे. रश्मिका-विजयने अधिकृत रित्या 'विरोशचे लग्न' असे म्हणत आपल्या नात्याची कबुली दिली आहे. एकमेकांवरचे प्रेम व्यक्त करताना ते कायमच दिसतात. त्यांचा रॉयल लग्न सोहळा उदयपूरमध्ये पार पडणार आहे. लग्नासाठी रश्मिका-विजयने एक लग्जरी हॉटेल बुक केले आहे. ज्याची किंमत वाचून तुम्हाला नक्कीच मोठा धक्का बसेल.

रश्मिका- विजयचे लग्न कुठे होणार?

रश्मिका आणि विजयचा रॉयल लग्न सोहळा राजस्थानमधील उदयपूर येथे पार पडणार आहे. उदयपूर जवळील 'आयटीसी मेमेंटोस' ( Mementos by ITC Hotels Ekaaya ) या लग्जरी हॉटेलमध्ये त्यांचे लग्न होणार आहे. या हॉटेलची सोशल मीडियावर चांगलीच चर्चा पाहायला मिळत आहे. हे हॉटेल सुंदर निसर्गाच्या सानिध्यात आहे. मात्र तितकेच महागडे देखील आहे.

हॉटेलचे भाडं किती?

मिळालेल्या माहितीनुसार, या लग्जरी हॉटेलमध्ये वेगवेगळ्या प्रकारे रूम, व्हिला पाहायला मिळतात. उदा. व्हॅली व्ह्यू व्हिला, लेक व्ह्यू व्हिला, प्रीमियम व्हिला, अरवली सूट, मेमेंटोस सूट , प्रेसिडेंशियल- ग्रँड प्रेसिडेंशियल लक्झरी सूट तसेच येथे स्विमिंग पूल, जकूझी देखील आहेत. सर्वसाधारणपणे येथे 30 हजारापासून 91 हजारापर्यंतचे व्हिला पाहायला मिळतात. लेक व्ह्यू व्हिलाची किंमत 30 हजार ते 31 हजार, अरवली सूटची किंमत 57 हजार ते 71 हजार आहे. आयटीसी मेमेंटोसमध्ये जवळपास 100 च्यावर व्हिला आहेत. तसेच येथे सर्व लग्जरी सुविधा पाहायला मिळतात.

रश्मिका मंदाना आणि विजय देवराकोंडा यांनी ऑक्टोबर 2025 मध्ये हैदराबादमध्ये साखरपुडा उरकला. रश्मिका मंदाना आणि विजय देवरकोंडा 26 फेब्रुवारी 2026 ला लग्न बंधात अडकणार आहे. तर लग्नाचे रिसेप्शन 4 मार्चला थाटामाटात पार पडणार आहे. लग्न सोहळा आणि रिसेप्शन दोन्ही हैदराबादमध्ये होणार आहे. रश्मिका मंदाना आणि विजय देवरकोंडा यांनी 2018 ला रिलीज झालेल्या 'गीता गोविंदम' आणि 2019 साली 'डियर कॉमरेड' या दोन चित्रपटांमध्ये काम केले आहे.

Rashmika-Vijay Wedding Venue And Cost
Rashmika Mandanna : विजयच्या आधी १३ वर्षांनी मोठ्या अभिनेत्याच्या प्रेमात होती रश्मिका; साखरपुडा झाला पण लग्न मोडले, नेमकं कारण काय?

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com