Rashmika Mandanna : विजयच्या आधी १३ वर्षांनी मोठ्या अभिनेत्याच्या प्रेमात होती रश्मिका; साखरपुडा झाला पण लग्न मोडले, नेमकं कारण काय?

Rashmika Mandanna-Vijay Deverakonda Wedding : साऊथ कपल रश्मिका मंदाना आणि विजय देवरकोंडा 26 फेब्रुवारीला उदयपूरमध्ये लग्नगाठ बांधणार आहे. रश्मिका मंदाना सध्या तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चांगली चर्चेत आहे.
Rashmika Mandanna-Vijay Deverakonda Wedding
Rashmika Mandannasaam tv
Published On
Summary

रश्मिका मंदाना आणि विजय देवरकोंडा उदयपूरमध्ये लग्न करणार आहे.

रश्मिका आणि विजय यांनी ऑक्टोबर 2025 मध्ये हैदराबादमध्ये साखरपुडा उरकला.

विजयला डेट करण्यापूर्वी रश्मिकाचा 13 वर्षांनी मोठ्या अभिनेत्यासोबत साखरपुडा झाला होता.

साऊथ इंडस्ट्रीचे पावर कपल रश्मिका मंदाना आणि विजय देवरकोंडा यांचे लग्न दोन दिवसांवर येऊन ठेपले आहे. दोघेही लग्नासाठी उदयपूरला पोहचले आहे. गेले अनेक वर्ष रश्मिका मंदाना आणि विजय देवरकोंडा एकमेकांना डेट करत आहेत. रश्मिका मंदाना आणि विजय देवराकोंडा यांनी ऑक्टोबर 2025 मध्ये हैदराबादमध्ये साखरपुडा उरकला. चाहत्यांनी त्यांच्या जोडीचे नाव 'विरोश' (VIROSH) असे ठेवले आहे. लग्नामुळे रश्मिका मंदानाचे वैयक्तिक आयुष्य चर्चेत आले आहे.

विजय पूर्वी रश्मिका कोणाला करत होती डेट?

नॅशनल क्रश रश्मिका मंदाना विजय देवरकोंडाला डेट करण्यापूर्वी तिचा एका अभिनेत्यासोबत साखरपुडा झाला होता. रश्मिका 13 वर्षांनी मोठ्या असलेल्या अभिनेत्याशी लग्न करणार होती. विजय देवरकोंडा पूर्वी रश्मिकाचा अभिनेता रक्षित शेट्टीसोबत साखरपुडा झाला होता. रक्षित शेट्टी हे कन्नड चित्रपटसृष्टीतील एक प्रसिद्ध नाव आहे. रश्मिका मंदानाने रक्षितसोबत तिच्या पहिल्या चित्रपट 'किरीक पार्टी' (2016) मध्ये काम केले होते. याच काळात त्यांच्यात मैत्री झाली आणि नंतर मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले. रश्मिकाने वयाच्या 21 व्या वर्षी रक्षितसोबत साखरपुडा केला.

रश्मिका मंदाना आणि रक्षित शेट्टीचा साखरपुडा 2017 मध्ये झाला, त्यानंतर 2018 मध्ये त्यांचे नाते तुटले. त्यांच्या ब्रेकअपचे कारण असे बोले जात होते की, दोघांमध्ये मतभेद होते. त्यांना करिअरवर लक्ष केंद्रित करायचे होते. त्यानंतर दोघेही आपापल्या आयुष्यात पुढे गेले. त्यानंतर रश्मिका मंदाना विजय देवरकोंडाला डेट करायला लागली आणि आता अखेर दोघे लग्न बंधनात अडकणार आहेत.

रश्मिका-विजय अडकणार लग्न बंधनात

रश्मिका मंदाना आणि विजय देवरकोंडा 26 फेब्रुवारी 2026 ला लग्न बंधात अडकणार आहे. तर लग्नाचे रिसेप्शन 4 मार्चला थाटामाटात पार पडणार आहे. लग्न सोहळा आणि रिसेप्शन दोन्ही हैदराबादमध्ये होणार आहे. रश्मिका मंदाना आणि विजय देवरकोंडा यांनी 2018 ला रिलीज झालेल्या 'गीता गोविंदम' आणि 2019 साली 'डियर कॉमरेड' या दोन चित्रपटांमध्ये काम केले आहे. चाहते आता या ग्रँड वेडिंगची उत्सुकतेने वाट पाहत आहेत.

Rashmika Mandanna-Vijay Deverakonda Wedding
Bigg Boss Marathi 6 : चहावरून घराचे तापमान वाढलं; अनुश्रीने थेट बाथरूम केला घाण, दिपालीशी घेतला पंगा| VIDEO

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com