Rashmika Mandanna: 14 वर्षांनी मोठ्या अभिनेत्यासोबत प्रेम, साखरपुडाही केला; का नाही केलं रश्मिका मंदान्नाने रक्षित शेट्टीसोबत लग्न?

Rasmika Break Her Engagement With Rishab: रश्मिकाने 14 वर्षांनी मोठ्या अभिनेत्यासोबत साखरपुडा केला होता. या अभिनेत्यासोबत ती लग्नही करणार होती. पण तिने हा साखरपुडा मोडत हे नातं संपवलं होतं.
rashmika mandanna and rakshit shetty
rashmika mandanna and rakshit shettySaam Tv
Published On

Rashmika Mandanna And Vijay Devarakonda:

साऊथची प्रसिद्ध अभिनेत्री रश्मिका मंदान्ना (Rashmika Mandanna) आणि विजय देवरकोंडा (Vijay Devarkonda) सध्या चांगलेच चर्चेत आहेत. हे कपल पुढच्या महिन्यामध्ये लग्न करणार असल्याची चर्चा सध्या सुरू आहे. पण या कपलने अद्याप याबाबत अधिकृत घोषणा केली नाही.

रश्मिका आणि विजय यांच्या नात्याची आताच नाही तर गेल्या अनेक वर्षांपासून चर्चा होत आहे. हे कपल सर्वांना प्रचंड आवडते. दोघे साखरपुडा करणार असल्याचे कळाल्यापासून त्यांचे चाहते खूपच उत्सुक झाले आहेत. पण अशामध्ये तुम्हाला हे माहिती आहे का की, रश्मिका मंदान्नाचा आधी देखील साखरपुडा झाला होता. रश्मिकाने 14 वर्षांनी मोठ्या अभिनेत्यासोबत साखरपुडा केला होता. या अभिनेत्यासोबत ती लग्नही करणार होती. पण तिने हा साखरपुडा मोडत हे नातं संपवलं होतं. यामागचे काय कारण होतं हे आपण जाणून घेणार आहोत...

रश्मिकाला चाहत्यांकडून 'नॅशनल क्रश' म्हटले जाते. रश्मिका मंदान्ना ही अशी अभिनेत्री आहे जिने साऊथपासून बॉलिवूड इंडस्ट्रीपर्यंत खूप नाव कमावले आहे. साऊथ चित्रपटांमध्ये आपल्या दमदार अभिनय आणि सौंदर्याच्या जोरावर प्रेक्षकांचे मन जिंकणाऱ्या रश्मिकाने बॉलिवूडमध्येही एन्ट्री करत आपले स्थान निर्माण केले आहे. नुकत्याच प्रदर्शित झालेल्या 'अ‍ॅनिमल'मधून रश्मिकाने सर्वांना प्रभावित केले. तिच्या या चित्रपटातील अभिनयाने देखील सर्वांचे मन जिंकले.

रश्मिका मंदान्नाने तिच्या करिअरची सुरुवात 2016 मध्ये आलेल्या 'क्रिक पार्टी' चित्रपटातून केली होती. या चित्रपटामध्ये रश्मिकासोबत अभिनेता रक्षित शेट्टी मुख्य भूमिकेत होता. रक्षित रश्मिकापेक्षा 14 वर्षांनी मोठा आहे. या चित्रपटाच्या सेटवरच दोघे एकमेकांच्या प्रेमात पडले. तिचा हा चित्रपट सुपरहिट ठरला. रश्मिकाने 2014 मध्ये तिच्या कॉलेजमध्ये 'टाइम्स फ्रेश फेस'चा किताब जिंकला होता. ज्यामुळे तिला मॉडेलिंगच्या ऑफर्स येत होत्या. यावेळी तिची भेट रक्षित शेट्टीसोबत झाली. रश्मिकाला पाहताच त्याने तिला आपल्या चित्रपटात कास्ट केले आणि येथूनच त्यांच्या प्रेमाला सुरुवात झाली होती.

रश्मिका आणि रक्षित शेट्टी चित्रपटाच्या सेटवर भेटले आणि प्रेमात पडले आणि त्यानंतर त्यांनी जवळपास एक वर्ष एकमेकांना डेट केले आणि यानंतर दोघांनीही सेटल होण्याचा विचार केला. त्यानंतर अभिनेत्रीने रक्षित शेट्टीसोबतच्या लग्नाची घोषणा केली आणि त्याच्यासोबतचे फोटो शेअर केले होते. त्यावेळी हे कपल प्रेक्षकांना देखील प्रचंड आवडले होते. रश्मिकाने २०१७ मध्ये रक्षित शेट्टीसोबत साखरपुडा देखील केला होता. पण दोघांचे नातं फक्त 14 महिनेच टिकले. त्यानंतर अभिनेत्रीने रक्षितसोबत झालेला साखरपुडा मोडला.

रश्मिका आणि रक्षित हे वेगळे झाले यामागचे कारण म्हणजे या दोघांच्याही सुसंगततेमध्ये समस्या येत होत्या. 14 महिन्याच्या नात्यामध्ये या दोघांमध्ये अनेक समस्या निर्माण झाल्या होत्या. काही रिपोर्ट्समध्ये असे म्हटले आहे की, रश्मिका आणि रक्षितने वेगळे झाले कारण त्यांच्या कुटुंबांमध्ये काही परस्पर मदभेद होते. ज्यावर ते सहमत नव्हते आणि म्हणून दोघांनी वेगळे होण्याचा निर्णय घेतला. यासोबतच, रश्मिकाला आपलं करिअर खूप उंचावर असल्याची जाणीव झाली आणि तिने घाईघाईने साखरपुडा मोडण्याचा निर्णय घेतला असल्याचे देखील सांगितले जात होते. लग्न करून आपले करिअर पणाला लागू नये यासाठी देखील तिने हा निर्णय घेतल्याचे सांगितले जात आहे.

rashmika mandanna and rakshit shetty
Saif Ali Khan Video: जेहचा फोटो काढणाऱ्या पापाराझींवर संतापला सैफ अली खान, VIDEO होतोय व्हायरल

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com