Bigg Boss Marathi 6 : चहावरून घराचे तापमान वाढलं; अनुश्रीने थेट बाथरूम केला घाण, दिपालीशी घेतला पंगा| VIDEO

Dipali Sayyed - Anushree Mane Big Fight : बिग बॉसच्या घरात मोठा राडा झाला आहे. चहावरून दिपाली आणि अनुश्री यांच्यात मोठे भांडण होते.
Dipali Sayyed - Anushree Mane Big Fight
Bigg Boss Marathi 6saam tv
Published On
Summary

बिग बॉसच्या घरातून सचिन कुमावतची एक्झिट झाली आहे.

घरात चहावरून दिपाली आणि अनुश्री यांच्यात वाद होतो.

राखी आणि रुचिता भांडणाची मजा घेताना दिसत आहेत.

बिग बॉसच्या घरात आता सातवा आठवडा सुरू आहे. काल बिग बॉसच्या घरातून गायक सचिन कुमावत बाहेर पडला. ज्यामुळे घरातील सदस्यांना खूप वाईट वाटले. आता नवीन आठवडा सुरू झाला आहे. त्यामुळे नवीन वादालाही सुरूवात झाली आहे. प्रभू आणि प्राजक्तामध्ये Power Key वरून वाद पाहायला मिळाला. त्यानंतर आता घरात दिपाली आणि अनुश्रीमध्ये भांडण झाले आहे. ज्यामुळे घराचे वातावरण तापले आहे.

बिग बॉसच्या नवीन प्रोमो समोर आला आहे. त्यात तुम्ही पाहू शकता की, चहावरून दिपाली आणि अनुश्री यांच्यात चांगलाच राडा होत आहे. अनुश्री दिपालीला चहा बनवण्यासाठी सांगत आहे. मात्र दिपाली नकार देते. ज्यावरून किचन एरियात दोघी भांडताना दिसतात. एकीकडे दोघांचे भांडण तन्वी सोडवण्याचा प्रयत्न करत आहे. तर दुसरीकडे राखी आणि रुचिता जेवण करताना यांची भांडणाची मजा घेताना दिसत आहे. दिपाली-अनुश्रीच्या भांडणाने राखी आणि रुचिताला खूप आनंद झाला आहे.

दिपाली- अनुश्री यांच्यातील वाद

  • अनुश्री - माझ्यासाठी चहा बनवलेला हवाय मला...

  • दिपाली - माझी Duty संपली आहे...

  • अनुश्री - तू बनवला होतास ना सर्वांसाठी, परत काय आहे...

  • दिपाली - ती वेळ होती ब्रेकफास्टची, आवाज खाली...

  • अनुश्री - मी फक्त तुला चहा बनवायला सांगितला आहे...ठीक आहे, मी सर्व खराब करून टाकते. टॉयलेट, बाथरूम बघूया कोण वापरते...

  • दिपाली - जा कर...

प्रोमोच्या शेवटी तुम्ही पाहू शकता की, अनुश्री बाथरूममध्ये जाणून सर्व घाण करते. ज्यामुळे आता घरात नवीन राडा होताना दिसणार आहे. नुकत्याच झालेल्या भाऊच्या धक्क्यावर अनुश्री आणि तन्वीचे रितेश भाऊंनी कौतुक केले होते आणि आता अनुश्रीचे हे वागणे घरातील सर्वांनाच खटकल्याचे दिसत आहे.  'बिग बॉस मराठी ६' हा शो रात्री 8 वाजता 'कलर्स मराठी' आणि 'जिओहॉटस्टार'वर पाहायला मिळणार आहे.

Dipali Sayyed - Anushree Mane Big Fight
Arbaaz Khan : मोजके सिनेमे करूनही अरबाज खान मालामाल; मुंबईत घेतला आलिशान फ्लॅट, सलमानच्या भावाचा स्वॅगच भारी

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com