Rashmika-Vijay Lovestory: गीता गोविंदम ते उदयपूरमध्ये लग्न; फिल्मी स्टोरीपेक्षा कमी नाही रश्मिका-विजयची लव्हस्टोरी

Rashmika-Vijay Lovestory: गीता गोविंदमपासून सुरू झालेली रश्मिका मंदान्ना आणि विजय देवरकोंडा यांची प्रेमकथा आता उदयपुरात विवाहबंधनात अडकणार. चाहत्यांच्या ‘विरोश’ नावाने खासगी समारंभात या कपलचा विवाह पार पडणार आहे.
Vijay-Rashmika Wedding
Vijay-Rashmika WeddingSaam tv
Published On

Rashmika-Vijay Lovestory: दक्षिणात्य सिनेजगतातील सर्वात चर्चित कपलपैकी एक रश्मिका मंदान्ना आणि विजय देवरकोंडा यांनी त्यांच्या प्रेमाची आणि विवाहाची अधिकृत घोषणा केली आहे. या दोघांची प्रेमकहाणी अब्जोन्मध्ये सुरू झाली होती. या कपलची लव्हस्टोरी नक्की एखाद्या चित्रपटाच्या कथेप्रमाणे आहे आणि आता हे कपल लवकरच लग्नबंधनात अडकणार आहेत.

दोघांनी आपल्या इंस्टाग्रामवर एका भावनिक नोटमध्ये सांगितले की त्यांच्या चाहत्यांनी त्यांना ‘VIROSH’ असे नाव दिले आहे. ज्यामध्ये दोन्हींचेही नाव आहे. त्यांनी आपल्या विवाहासाठी देखील हेच नाव दिले आहे. द वेडिंग ऑफ विरोश. आपल्या नोटमध्ये त्यांनी आपल्या चाहत्यांचे प्रेम आणि पाठिंबा याबद्दल मनापासून आभारही मानले.

Vijay-Rashmika Wedding
Actress Father Died: अभिनेत्री विष्णू प्रियाच्या वडिलांची हत्या; घरात शिरून संपवलं, पोलीस तपासात धक्कादायक खुलासे

या कपलच्या प्रेमकथेची सुरुवात २०१८ मध्ये त्यांनी तेलगू हिट चित्रपट गीथा गोविंदम मध्ये एकत्र काम करताना झाली, जिथे त्यांच्या ऑन-स्क्रीन केमिस्ट्रीने चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले आणि नंतर प्रत्यक्ष जीवनातही हे नातं अधिक घट्ट बनलं. त्यानंतर डिअर कॉम्रेड सारख्या सिनेमांमध्येही त्यांनी एकत्र काम केले. तेव्हापासून त्यांच्या नात्याची चर्चा अधिक वाढली.

Vijay-Rashmika Wedding
Rashmika-Vijay Wedding: 'Virosh'ची लगीनघाई...; विजय देवरकोंडा अन् रश्मिका मंदान्ना उदयपुरमध्ये पोहोचले, पाहा VIDEO

त्यानंतर २०२५च्या सुरुवातीला जेव्हा दोघे रोममध्ये एकत्र नवीन वर्ष साजरे करताना दिसले तेव्हा अफवांना वेग आला. गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये, रश्मिका मंदान्ना आणि विजय देवरकोंडा यांनी विजयच्या हैदराबाद येथील घरी एका खाजगी समारंभात साखरपुडा केल्याच्या अफवा पसरल्या होत्या. तसेच एका महिन्यानंतर, दोघेही रश्मिकाच्या 'द गर्लफ्रेंड' चित्रपटाच्या प्रमोशनल कार्यक्रमात दिसले, जिथे विजय तिच्या हातावर किस केले आणि चाहत्यांना यांच्या नात्याची कबुली मिळाली आणि काल त्यांनी त्यांच्या लग्नाची घोषणा करुन चाहत्यांना गोड सरप्राईज दिलं.

विवाह २६ फेब्रुवारी २०२६ रोजी राज्यातील राजसी शहर उदयपुर, राजस्थान येथे पार पडणार आहे, हा एक खासगी समारंभ आहे, जिथे फक्त जवळचे कुटुंबीय आणि निवडक मित्र उपस्थित असतील. कार्यक्रम ‘नो-फोन पॉलिसी’ आणि एफब्लिक नॉन-डिस्क्लोजर अ‍ॅग्रीमेंट (एनडीए) तयार करण्यात आला आहे. या लग्नाचे प्री-वेडिंग समारंभ फेब्रुवारी २४ आणि २५ रोजी आयोजित केले जाणार आहेत, ज्यात संगीत, मेहंदी आणि हळदीचे विधी पार पडतील. विवाहानंतर हैदराबाद आणि मुंबईमध्ये रिसेप्शन्सही ठेवण्यात येणार आहे. सिनेमाच्या सेटवर भेटलेले हे दोघे आता कायमचे लग्नबंधनात अडकणार आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com