Manasvi Choudhary
हॉटेलला गेल्यानंतर चिकन चिली खायला अनेकांना आवडते. अनेकजण चिकन चिली ऑर्डर करतात.
चिकन चिली बनवण्याची रेसिपी अत्यंत सोपी आहे. तुम्ही घरीच सहजपणे चिकन चिली बनवू शकता.
चिकन चिली बनवण्यासाठी बोनलेस चिकन, आलं - लसूण पेस्ट, कॉर्नफ्लोर, मैदा, अंडा, मीठ, मिरी पावडर, सोया सॉस, रेड चिली सॉस, व्हिनेगर, टोमॅटो सॉस, लसूण, आलं, हिरवी मिरची, कांदा, सिमला मिरची हे मिश्रण एकत्र करा.
एका बाऊलमध्ये चिकन घ्या त्यात आलं- लसूण पेस्ट, मीठ, मिरी पावडर, अंडा आणि कॉर्नफ्लोर मिक्स करून घ्या हे मिश्रण काही मिनिटे बाजूला ठेवा.
गॅसवर कढईत तेल गरम करा आणि त्यात चिकनचे तुकडे सोनेरी रंग होईपर्यत फ्राय करून घ्या.
कढईत दुसऱ्या बाजूला गरम तेलामध्ये लसूण आणि आलं टाका त्यानंतर यात हिरव्या मिरच्या, कांदा आणि सिमला मिरची टाका.
या मिश्रणात सोया सॉस, चिली सॉस, टोमॅटो केचप आणि व्हिनेगर टाका. थोडीशी साखर घाला आता १ चमचा कॉर्नफ्लोर पाव कप पाण्यात मिसळून त्याचे मिश्रण मिक्स करा.
मिश्रण थोडा घट्ट झाला की त्यात तळलेले चिकनचे तुकडे टाका. मोठ्या आचेवर १ मिनिट छान टॉस करा जेणेकरून सॉस चिकनला व्यवस्थित लागेल. शेवटी वरून बारीक चिरलेली कांद्याची पात टाका.