

दाक्षिणात्य सिनेसृष्टीपासून बॉलिवूडपर्यंत ज्या जोडीच्या लग्नाची चर्चा गेल्या अनेक महिन्यांपासून रंगली होती, त्या जोडीने अखेर आज चाहत्यांच्या प्रतिक्षेला पूर्णविराम लावलाय... नॅशनल क्रश रश्मिका मंदान्ना आणि दाक्षिणात्य सुपरस्टार विजय देवरकोंडा अखेर लग्नबंधनात अडकलेत...राजस्थानच्या उदयपूरमध्ये शाही थाटात हा विवाहसोहळा पार पडला...मात्र देवरकोंडा आणि रश्मिकाच्या लग्नाऐवजी त्याच्या 'इन्स्टाग्राम'वरील एका कृतीची जोरदार चर्चा रंगलीय...
अभिनेता विजय देवरकोंडाचे इन्स्टाग्रामवर 2.22 कोटी फॉलोवर्स असून ते कोणालाही फॉलो करत नाहीत...दुसरीकडे, रश्मिका मंदान्नाचे इन्स्टाग्रामवर 4.99 कोटी फॉलोवर्स आहेत... रश्मिका 341 लोकांना इन्स्टाग्रामवर फ़ॉलो करत असून ज्यात अभिनेत्री मंदान्ना आपला पती विजय देवरकोंडा, सासू माधवी देवरकोंडा आणि दीर आनंद देवरकोंडा या सर्वांना फॉलो करते.
विजय देवरकोंडानं रश्मिका सोबतचे लग्नानंतरचे फोटो शेअर करत माझी मैत्रीण माझी बायको झालीय, असं म्हटलंय. आता सिल्व्हर स्क्रीनवर आपल्या केमिस्ट्रीनं ब्लॉकबस्टर ठरणारी ही जोडी रिअल लाईफमध्ये सोबत आल्यानंतर व्हर्च्युअली सोशल मीडियावर एकमेकांना फॉलो करणार का? याकडे चाहत्याचं लक्ष आहे...
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.