Shocking : ५५ वर्षीय महिलेवर आधी अत्याचार, नंतर हत्या करून शेतात फेकला मृतदेह; २५ वर्षीय संशयित तरुण पोलिसांच्या ताब्यात

nandurbar shocking news : नंदूरबारमध्ये ५५ वर्षीय महिलेवर अत्याचार करून हत्या करण्यात आल्याची घटना घडली. या घटनेनंतर सर्वत्र संताप व्यक्त केला जात आहे.
nandurbar news
nandurbar shocking Saam tv
Published On

सागर निकवाडे, साम टीव्ही

नंदूरबार : देशासह राज्यातील महिला अत्याचाराचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. नंदूरबारच्या नवापूर तालुक्यातून खळबळजनक घटना समोर आली आहे. ५५ वर्षीय महिलेवर अत्याचार करण्यात आल्याची घटना घडली. या अत्याचारानंतर महिलेची निर्घृण हत्या करण्यात आली आहे. महिलेवरील अत्याचारानंतर परिसरात खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, नवापूरच्या गंगापूर परिसरातील ५५ वर्षीय महिलेवर अत्याचार करून हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. महिला रात्री उशिरापर्यंत घरी न परतल्याने कुटुंबीयांना शोध घेतला. त्यानंतर नानगीपाडा रस्त्यावरील ज्वारीच्या शेतात महिला गंभीर अवस्थेत सापडली. जखमी अवस्थेत महिलेला तातडीने रुग्णालयात दाखल केलं. परंतु उपचारादरम्यान महिलेचा मृत्यू झाला.

nandurbar news
माजी मुख्यमंत्र्यांच्या नातवाचा संशयास्पद मृत्यू; राजकीय वर्तुळात खळबळ

महिलेच्या मृत्यूनंतर विसरवाडी पोलिसांनी वेगाने चक्र फिरवली. त्यानंतर पोलिसांनी २५ वर्षीय संशयिताला ताब्यात घेतलं. महिलेच्या मृत्यूनंतर नवापूर तालुक्यात प्रचंड आक्रमक व्यक्त करण्यात येत आहे. या आरोपीला कठोर शिक्षा देण्याची नागरिकांची मागणी आहे. या घटनेनंतर नवापूर तालुक्यात संतापाची लाट पसरली असून आरोपीवर कठोर कारवाईची मागणी करण्यात येत आहे. या घटनेचा तपास पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक नरेंद्र साबळे करीत आहेत.

nandurbar news
राज्यात रस्ता अपघाती मृत्यूदरात लक्षणीय घट; सरकारचे कोणते उपाय ठरताहेत गेम चेंजर?

पाच वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार

कोल्हापूर शहरात पाच वर्षांच्या मुलीवर लैंगिक अत्याचार झाल्याची घटना उघडकीस आली. मुलीला बांधकामाच्या साईटवर नेऊन अत्याचार केल्याप्रकरणी संशयित आरोपीला राजारामपुरी पोलीस ठाणे यांच्या पथकाने अटक केली आहे. या घटनेने परिसरात तीव्र संताप व्यक्त करण्यात आला. काल सकाळी मुलगी अस्वस्थ दिसत होती. तिने पालकांना घडलेला प्रकार सांगितला. त्यानंतर नातेवाईकांनी तत्काळ संशयिताचा शोध घेतला. आरोपीला पकडून पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. पोलिसांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेत तातडीने गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी आरोपीला अटक करण्यात आली आहे. पुढील तपास सुरू असून या घटनेमुळे शहरात संतापाची लाट पसरली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com