Ram Mandir Song Teaser Released Saam Tv
मनोरंजन बातम्या

Ram Mandir Song: राम मंदिर उद्घाटनानिमित्त येतंय मराठी गाणं, गाण्याचा टीझर एकदा बघाच

Priya More

Ram Mandir Song Teaser Released:

२२ जानेवारी २०१४ रोजी अयोध्येत (Ayodhya) भव्य राम मंदिराचे उद्घाटन होणार आहे. याबाबत संपूर्ण देशात उत्साह आणि आनंदाचे वातावरण आहे. या उद्घाटन सोहळ्याची सध्या जोरदार तयारी सुरू आहे. या सोहळ्यासाठी देशभरातील आणि जगभरातील नामांकित व्यक्तींना आमंत्रित करण्यात आले आहे. 3 हजार व्हीव्हीआयपींसह 7 हजार पाहुण्यांना निमंत्रण पाठवण्यात आले आहे. हा सोहळा खूपच खास होणार आहे. अयोध्येतील राम मंदिराच्या उद्घाटनानिमित्त एक गाणे तयार केले जात आहे आणि नुकताच या गाण्याचा टीझर प्रदर्शित करण्यात आले आहे.

उत्तर प्रदेशातील अयोध्येत (Ayodhya) बांधण्यात येत असलेल्या राम मंदिराचा उद्घाटन सोहळा (Ram Mandir Opening) पुढच्या वर्षी २२ जानेवारीला होणार आहे. या सोहळ्याकडे फक्त देशाचेच नाही तर जगाचे लक्ष लागले आहे. महत्वाचे म्हणजे या सोहळ्या इतर देशातील प्रतिष्ठित व्यक्ती देखील हजेरी लावणार आहे. या सोहळ्यासाठी खास व्यवस्था देखील केली जात आहे. हा सोहळा आणखी आकर्षक बनवण्यासाठी अयोध्येतील राम मंदिराच्या उद्घाटनानिमित्त एक गाणे तयार केले जात आहे. नुकताच या गाण्याचा टीझर प्रदर्शित करण्यात आला आहे. अल्पवधीतच या टीझरला खूपच चांगली पसंती मिळाली आहे.

माजी आमदार आणि भाजपचे प्रवक्ते अतुल शहा यांच्या हस्ते आज मुंबईत या गाण्याचा टीजर लाँच करण्यात आला. राम मंदिराचा अभिषेक सोहळा हा जगभरातील हिंदूंसाठी आनंदाचा क्षण आहे. हा आनंद या गाण्यातही दिसून येणार आहे. नुकताच रिलीज करण्यात आलेल्या टीझरमधून याची झलक पाहायला मिळत आहे. हे गाणं मराठीमध्ये आहे. अतुल शहा यांनीच या गाण्याची निर्मिती केली आहे. या गाण्याचे गीत मोहन सामंत यांचे असून संगीत दत्ता शिंदे यांनी दिले आहे.

दरम्यान, या उद्घाटन सोहळ्यासाठी श्री रामजन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टने दिग्गज क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर, विराट कोहली, बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन, अक्षय कुमार, आशा भोसले आणि उद्योगपती मुकेश अंबानी यांच्यासह ७ हजार पाहुण्यांना आमंत्रणे पाठवली आहेत. या सेलिब्रिटींशिवाय १९९२ मध्ये मारल्या गेलेल्या कारसेवकांच्या कुटुंबीयांनाही निमंत्रण पाठवण्यात आले आहे. याशिवाय राष्ट्रीय स्वयंसेवक संघ म्हणजे आरएसएसचे प्रमुख मोहन भागवत, योगगुरू रामदेव बाबा, उद्योगपती रतन टाटा, उद्योगपती गौतम अदानी हेही सहभागी होणार आहेत.

दरम्यान, अयोध्येतील राम मंदिराच्या उद्घाटन सोहळ्याच्या वेळीची देखील माहिती समोर आली आहे. या कार्यक्रमाच्या वेळ आणि तारखेबद्दल बोलताना ट्रस्टने सांगितले की, नवीन राम मंदिराचे उद्घाटन २२ जानेवारी २०२३ रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे. कार्यक्रमाची वेळ सकाळी ११ ची असणार आहे. सुमारे ३ तास ​​हा कार्यक्रम सुरू राहणार असल्याचे देखील त्यांनी स्पष्ट केले.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Updates: मनोज जरांगेंची प्रकृती खालावली, उपचार घेण्यास नकार

EPFO: UAN नंबर विसरलात? टेन्शन सोडा, या सोप्य स्टेप्स फॉलो करुन जाणून घ्या

Jalna Accident: जालन्यात बस- ट्रकचा भीषण अपघात! ५ ते ६ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती

iPhone 16 चा सेल सुरू, 67500 रुपयांपर्यंतची ऑफर; किंमत, ऑफर आणि खरेदीचे ठिकाण वाचा सर्वकाही

Sambhajinagar Corporation : पाणी पुरवठ्यासाठी करणार सौरऊर्जेचा वापर; शंभर एकर जागेवर संभाजीनगर महापालिका उभारणार प्रकल्प

SCROLL FOR NEXT