Gunratna Sadavarte: माझ्या आजीच्या सौंदर्यापुढं रश्मिका मंदान्नाही फिकी, असं का म्हणाले गुणरत्न सदावर्ते?

South Actress Rashmika Mandanna: नुकताच दिलेल्या मुलाखतीमध्ये ॲडव्होकेट गुणरत्न सदावर्ते यांनी आजीची आठवण सांगितली. यावेळी त्यांनी आजीच्या सौंदर्याचे खूपच कौतुक केले. त्यांनी आजीच्या सौंदर्याची तुलना रश्मिका मदान्नासोबत केली.
Gunratna Sadavarte On Rashmika Mandanna
Gunratna Sadavarte On Rashmika MandannaSaam Tv
Published On

Gunratna Sadavarte On Rashmika Mandanna:

परखड आणि रोखठोक मत मांडणारे ॲडव्होकेट गुणरत्न सदावर्ते (Gunaratna Sadavarte) हे नेहमीच चर्चेत राहतात. सरकार असो वा एखादा नेता त्यांच्याविरोधात देखील ते स्पष्टपणे बोलतात. यामुळे अनेकदा ते वादाऱ्या भोवऱ्यामध्ये देखील सापडले आहेत. राज्यात सध्या सुरू असलेल्या आंदोलनांवर देखील ते स्पष्टपणे आपले मत मांडत आणि भूमिका स्पष्ट करतात. यामुळे ॲडव्होकेट गुणरत्न सदावर्ते हे नेहमी चर्चेत राहतात.

अशामध्ये स्पष्टवक्ते सदावर्ते यांनी एबीपी माझाला मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये ते त्यांच्या पर्सनल लाइफसंबंधी मनमोकळेपणाने बोलले. तसंच त्यांनी अनेक खुलासे देखील केले. यावेळी बोलताना त्यांनी त्यांच्या आजीच्या सौंदर्याची तुलना साऊथ अभिनेत्री रश्मिका मंदान्नासोबत (Rashmika Mandanna) केली.

माझा कट्ट्यावर ॲडव्होकेट गुणरत्न सदावर्ते यांनी आजीची आठवण सांगितली. यावेळी त्यांनी त्यांच्या आजीच्या सौंदर्याचे खूपच कौतुक केले. त्यांनी सांगितले की, 'माझी आजी इतकी सुंदर होती की तिच्यापुढे आताची रश्मिका मंदान्ना देखील फिकी आहे. माझ्या आजीपुढे रश्मिका मंदान्ना पाणी कम चाय असे म्हणावे लागेल. माझ्या आजीची उंची सहा फूट होती आणि रशियन मुलींप्रमाणे सुंदर दिसायची. आजी खूपच स्लिम होती. ती मला अडव्होकेट म्हणायची. तिला वाटायचे मी वकीलच झालो पाहिजे '

Gunratna Sadavarte On Rashmika Mandanna
Mumbai Model Arrested: ३२ वर्षीय मॉडेलला देहरादून एअरपोर्टवर अटक, नेमकं कारण काय?

यावेळी गुणरत्न सदावर्ते यांनी त्यांच्या संघर्षाची देखील कहाणी सांगितली. यावेळी भावूक होत ते म्हणाले की, 'मी पहिल्यांदा दंत चिकित्सक होतो त्यानंतर विधिज्ञच्या वाटेवर आलो. माझी आई खूप जिद्दी आहे. तिला खोटे बोलले जमत नाही. तिला सर्व नीटनेटकं पाहिजे. तिची खूप इच्छा होती की मी डॉक्टर व्हावे. तिचा माझ्यावर खूपच प्रभाव होता. काहीही झालं तरी मी डॉक्टर झालोच पाहिजे असे तिला वाटत होते.' तसंच, 'त्याच्याविरोधात घरात दुसरा एक विचार होता. तो म्हणजे आजी. माझ्या घरामध्ये ५ जण गुन्हेगार होते. त्यामुळे आजीला डाकुंची आई असे म्हटले जायचे. माझे वडील शेवटचे बालगुन्हेगार होते.'

Gunratna Sadavarte On Rashmika Mandanna
Shruti Haasan: मला दारू प्यायची सवयी लागली होती पण..., श्रृती हासनने सांगितला ८ वर्षांच्या स्ट्रगलचा तो किस्सा

दरम्यान, गुणरत्न सदावर्ते हे मूळचे नांदेडचे आहेत. त्यांनी एमबीबीएसपर्यंतचं शिक्षण पूर्ण केले आहे. शिक्षण घेत असतानाच त्यांनी विद्यार्थ्यांसाठी अनेक आंदोलन केली. त्यांचे शिक्षण संभाजीनगर आणि मुंबईतून पूर्ण झाले आहे. काही वर्षांपूर्वी ते सदावर्ते नांदेडमध्ये राहत होते. पण त्यानंतर ते मुंबईत स्थायिक झाले. त्यांनी मुंबईत आल्यानंतर वकिली सुरू केली. भारतीय राज्यघटनेचे ते अभ्यासक आहेत. त्यांनी संविधानावर पीएचडी देखील केली आहे. विविध केसमुळे ते वारंवार चर्चेत असतात.

Gunratna Sadavarte On Rashmika Mandanna
Salaar Advance Booking: अ‍ॅडव्हान्स बुकिंगमध्ये प्रभासच्या 'सालार'नं किंग खानच्या 'डंकी'ला टाकलं मागं, १२ तासांत केली इतकी कमाई

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com