Mumbai Model Arrested: ३२ वर्षीय मॉडेलला देहरादून एअरपोर्टवर अटक, नेमकं कारण काय?

Dehradun Airport: देहरादूनच्या जॉली ग्रँट एअरपोर्टवर तैनात असलेल्या महिला सीआयएसएफ अधिकाऱ्यासोबत या मॉडेलने गैरवर्तन केले. त्याचसोबत तिने एअरपोर्ट बॉम्बने उडवून देण्याची धमकी दिली.
Dehradun Airport
Dehradun AirportSaam Tv
Published On

Model Megha Sharma Arrested:

मुंबईतील एका प्रसिद्ध मॉडेलला देहरादून एअरपोर्टवर (Dehradun Airport) अटक करण्यात आली आहे. या मॉडेलने एअरपोर्टवर तैनात असलेल्या सुरक्षारक्षकासोबत गैरवर्तन केले आणि एअरपोर्ट बॉम्बने उडवून देण्याची धमकी दिली. या घटनेनंतर या मॉडेलला पोलिसांनी अटक (Mumbai Model Arrested) केली. त्यानंतर जामीनावर तिची सुटका झाली.

मिळालेल्या माहितीनुसार, मेघा शर्मा असं या ३२ वर्षीय मॉडेलचे नाव आहे. ती मुंबईमध्ये राहते. देहरादूनच्या जॉली ग्रँट एअरपोर्टवर तैनात असलेल्या महिला सीआयएसएफ अधिकाऱ्यासोबत तिने गैरवर्तन केले. त्याचसोबत तिने एअरपोर्ट बॉम्बने उडवून देण्याची धमकी दिली. याप्रकरणी सीआयएसएफ उपनिरीक्षक सुनीता देवी यांनी तक्रार केली. या तक्रीनंतर तिला अटक करण्यात आली होती.

Dehradun Airport
Salaar Advance Booking: अ‍ॅडव्हान्स बुकिंगमध्ये प्रभासच्या 'सालार'नं किंग खानच्या 'डंकी'ला टाकलं मागं, १२ तासांत केली इतकी कमाई

एअरपोर्टवर बॅग चेकिंग करत असताना या मॉडेलने वाद घातला. मेघाच्या हँडबॅगचा फोटो स्क्रिनिंग सिस्टमवर स्टष्टपणे दिसत नव्हता. त्यामुळे सुनीता देवी यांनी मॅन्युअली हँडबॅग चेकिंगची विनंती केली. त्यावेळी मेघाने त्यांच्यासोबत वाद घातला आणि अपशब्दांचा वापर करत तिने एअरपोर्टवर गोंधळ घातला. जेव्हा सुनीता देवी यांनी मेघाला सहकार्य करण्याचे आवाहन केले तर तिने एअरपोर्ट बॉम्बस्फोट करून उडवून देण्याची धमकी दिली.

Dehradun Airport
Ram Mandir Song: राम मंदिर उद्घाटनानिमित्त येतंय मराठी गाणं, गाण्याचा टीझर एकदा बघाच

मेघा तिच्या एका मित्रासोबत मसुरीला गेली होती. त्यानंतर ती शुक्रवारी दुपारी ३.१० वाजता फ्लाइटने मुंबईला परत येण्यासाठी निघाली होती. पण एअरपोर्टवर तिने नियमित बॅग स्कॅनिंगदरम्यान महिला सीआयएसएफ अधिकाऱ्यासोबत भांडण केले. मेघाने सिक्युरिटी प्रोटोकॉलचे पालन करण्यास नकार दिला. तिने फक्त सहकार्य करण्यास विरोध केला नाही तर तिने एअरपोर्ट बॉम्बने उडवून टाकण्याची धमकी दिली.

यानंतर सीआयएसएफ अधिकाऱ्याने एअरपोर्टवर गोंधळ घालणाऱ्या मेघाला ताबडतोब पकडलं आणि स्थानिक पोलिसांच्या ताब्यात दिले. याप्रकरणी पोलिसांनी मेघाविरोधात कलम ३५३ आणि ५०४ अंतर्गत गुन्हा दाखल करत तिला अटक केली. या घटनेनंतर शुक्रवारी रात्री मेघाची जामीनावर सुटका करण्यात आली.

Dehradun Airport
Shruti Haasan: मला दारू प्यायची सवयी लागली होती पण..., श्रृती हासनने सांगितला ८ वर्षांच्या स्ट्रगलचा तो किस्सा

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com