Crime News
Crime NewsSaam Digital

Crime News: सावधान! आपल्या आसपास फिरतायेत विकृत प्रवृत्तीचे गुन्हेगार, पोलिसांकडून छायाचित्र प्रसिध्द

Crime News: नालासोपारा शहरामध्ये सध्या शाळकरी मुलींना रस्त्यात अडवून तसेच घराबाहेर खेळणार्‍या मुलींवर अत्याचार केल्याच्या घटना घडत आहेत. या प्रकऱणी तुळींज पोलीस स्थानकात दोन वेगवेगळ्या घटनांबाबत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
Published on

Crime News

वसई विरार शहरात पुन्हा एकदा अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचार करणार्‍या विकृताची (सिरियल मॉलेस्टर) दहशत पसरली आहे. हे विकृत रस्त्यावर मुलींना अडवून त्यांना जबरदस्तीने आडोशाला नेऊन त्यांच्यावर अत्याचार करत आहेत. याप्रकारामुळे पालकांमध्ये घबराट पसरली आहे. दरम्यान तुळींज पोलिसांनी दोन विकृत आरोपींची छायाचित्रे प्रसिध्द केली असून त्यांची माहिती देणार्‍याला बक्षीस जाहीर केले आहे.

नालासोपारा शहरामध्ये सध्या शाळकरी मुलींना रस्त्यात अडवून तसेच घराबाहेर खेळणार्‍या मुलींवर अत्याचार केल्याच्या घटना घडत आहेत. या प्रकऱणी तुळींज पोलीस स्थानकात दोन वेगवेगळ्या घटनांबाबत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पहिली घटना ५ ऑक्टोबर रोजी तर दुसरी घटना १५ नोव्हेंबर रोजी घडली. यामध्ये अनुक्रमे ७ आणि ९ वर्षांच्या मुलींचा अज्ञात विकृतांनी विनयभंग करून लैंगिक अत्याचार केला आहे. या मुलींनी पालकांना हा प्रकार सांगितल्यानंतर ही घटना उघडकीस आली. अशी माहिती तुळींज पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक मिथुन म्हात्रे यांनी दिली. या दोन्ही प्रकऱणात दोन विकृतांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Crime News
Pune Accident News: इमारतीवरून डोक्यात सळई पडून ९ वर्षांच्या मुलाचा मृत्यू, शाळेतून घरी जाताना घडली दुर्घटना

तुळींज पोलिसांनी या दोन्ही विकृत आरोपींना पकडण्यासाठी विशेष पथके तयार केली आहेत. दरम्यान या आरोपींची छायाचित्रे ठिकठिकाणी लावण्यात आली आहेत. तसेच त्यांची माहिती देणार्‍याला बक्षीसही जाहीर करण्यात आल्याची माहिती तुळींज पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शैलेंद्र नगरकर यांनी दिली. दरम्यान पालक आणि मुलींनी सावध राहण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.

Crime News
Lalit Patil Case: ललित पाटील प्रकरणी मोठी घडामोड: ससूनमधील क्लार्क अन् नर्सेसची चौकशी सुरू; मोठ्या कारवाईची शक्यता

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com