Lalit Patil Case: ललित पाटील प्रकरणी मोठी घडामोड: ससूनमधील क्लार्क अन् नर्सेसची चौकशी सुरू; मोठ्या कारवाईची शक्यता

Lalit Patil Case Update: ससून रुग्णालयातील उपचार करणारे वरिष्ठ डॉक्टर, लेक्चरर, एक्स-रे तज्ञ आदी कर्मचाऱ्यांची सध्या चौकशी सुरू आहे.
Drug mafia Lalit Patil health deteriorated treatment started at Sassoon hospital
Drug mafia Lalit Patil health deteriorated treatment started at Sassoon hospitalSaam TV
Published On

अक्षय बडवे, प्रतिनिधी

Lalit Patil Case Update:

राज्यात सध्या ड्रग्जमाफिया ललित पाटीलचे प्रकरण चांगलेच चर्चेत आहे. कोट्यावधी रुपयांच्या ड्रग्ज तस्करीचे आरोप असलेल्या ललित पाटील प्रकरणात रोज नवनवे खुलासे होत आहेत. या प्रकरणी पुण्यातील ससून रुग्णालय चांगलेच अडचणीत आले असून ललित पाटीलचे पलायन आणि त्याच्या रुग्णालयातील मुक्कामावरुन ससूनच्या क्लार्क आणि नर्सेसची सध्या चौकशी सुरू आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, ड्रग्जमाफिया ललित पाटीलने (Lalit Patil) पलायन केल्यानंतर पुण्यातील (Pune) ससून रुग्णालय चौकशीच्या फेऱ्यात अडकले. ललित पाटीलला पळून जाण्यात कोणी मदत केली का? गेले ९ महिने त्याच्यावर रुग्णालयात कोणते उपचार सुरू होते. त्याच्या मुक्कामासाठी कोण प्रयत्न करत होते. यासंबंधाची कसून चौकशी सध्या सुरू असून ससून रुग्णालय हे चौकशीचे केंद्रबिंदू ठरत आहे.

ललित पाटीलवर ससून रुग्णालयात (Sasoon Hospital) उपचार करणारे वरिष्ठ डॉक्टर, लेकचरर, एक्स रे तज्ञ आदी कर्मचाऱ्यांची सध्या चौकशी सुरू आहे. या प्रकरणात पहिल्यापासून विरोधकांच्या रडावर असलेले डॉक्टर संजीव ठाकूर आणि त्यांच्या पथकातील डॉक्टरांचीही चौकशी सुरू असून या प्रकरणी दोषी आढळल्यास मोठी कारवाई होण्याची शक्यता आहे.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Drug mafia Lalit Patil health deteriorated treatment started at Sassoon hospital
Nandurbar News : ट्रांसफार्मर फेल झाल्याने तीन दिवसांपासून १२ गावे अंधारात; वीजवितरक कंपनीचे दुर्लक्ष

दरम्यान, ललित पाटील प्रकरणात पहिल्यापासून विरोधकांकडून गृहमंत्री आणि राज्य सरकारच्या तपासावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. शिवसेना ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे (Sushma Andhare) यांनी या प्रकरणी शिंदे गटाच्या मंत्र्यांचा हात असल्याचा मोठा आरोप केला आहे. तसेच कॉंग्रेस नेते रविंद्र धंगेकर (Ravindra Dhangekar) यांनीही या प्रकरणी आवाज उठवत ससूनच्या डीनवर मोठ्या कारवाईची मागणी केली आहे. (Latest Marathi News)

Drug mafia Lalit Patil health deteriorated treatment started at Sassoon hospital
Pune Breaking News: धक्कादायक! लसीकरणासाठी आणलेल्या श्वानाचा क्लिनिकमध्ये मृत्यू; डॉक्टरांसह चौघांवर गुन्हा दाखल

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com