Pune Breaking News: धक्कादायक! लसीकरणासाठी आणलेल्या श्वानाचा क्लिनिकमध्ये मृत्यू; डॉक्टरांसह चौघांवर गुन्हा दाखल

Pune Latest News: श्वानाच्या मृत्यूला कारणीभूत ठरल्याप्रकरणी संबंधित डॉक्टरसह चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Pune Crime News
Pune Crime NewsSaam TV
Published On

अक्षय बडवे, प्रतिनिधी

Pune Breaking News:

पुणे शहरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. पुण्यामध्ये लसीकरणादरम्यान एका श्वानाचा मृत्यू झाल्याचा प्रकार समोर आला आहे. चतुश्रुंगी पोलीस ठाण्याच्या हद्दीत हा प्रकार घडला असून श्वानाच्या मृत्यूला कारणीभूत ठरल्याप्रकरणी संबंधित डॉक्टरसह चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

वार्षिक लसीकरणासाठी आलेल्या श्वानाचा गळ्याचा पट्टा आवळल्याने मृत्यू झाल्याचा धक्कादायक प्रकार पुण्यामध्ये (Pune) घडला. समोर आलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिलेकडे लॅब्रोडोर जातीचा एक श्वान होता. दरवर्षी या श्वानाचे लसीकरण करणे गरजेचे असते. त्यानुसार त्या श्वानाला घेऊन पाषाण येथील विगल्स माय पेट क्लिनिकमध्ये गेल्या होत्या.

लस देण्यासाठी डॉ. राजपुत आणि त्यांचे सहकारी पट्ट्याने श्वान झाडाला बांधण्यासाठी प्रयत्न करत होते. यावेळी डॉक्टरांनी त्यांच्याकडील लावलेला पट्टा श्वानाच्या गळ्याला घट्ट बसून त्याला फास बसला. त्यामुळे श्वान जाग्यावरच खाली कोसळला. त्याला उपचारासाठी क्लिनीकमध्ये नेले मात्र दुर्दैवाने श्वानाचा मृत्यू झाला.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Pune Crime News
Hingoli News : ४८ तासांपासून युवक पाण्याच्या टाकीवरच; ग्रामस्थ व पोलीसही विनंती करून थकले, भ्रष्टाचाराविरुद्ध आंदोलन

श्वानाच्या मृत्यूनंतर डॉक्टर त्यांना काहीच न बोलता निघून गेले. या घटनेनंतर श्वान मालकाने चतुश्रुंगी पोलीस ठाण्यात धाव घेत फिर्याद दाखले केली. या फिर्यादीनुसार श्वानाच्या मृत्यूला कारणीभूत ठरल्याप्रकरणी डॉ. संजीव राजाध्यक्ष, डॉ. शुभम राजपुत आणि त्यांच्या दोन सहाय्यक कर्मचाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Latest Marathi News)

Pune Crime News
Pune Railway Block: महत्वाची बातमी! पुण्यात २ दिवस रेल्वेचा मेगाब्लॉक; लोकलसह अनेक गाड्या रद्द, वाचा सविस्तर...

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com