Sushma Andhare News: मराठा- ओबीसीत वाद लावले जाताय; सुषमा अंधारे यांचा आरोप

Nanded News : प्रचाराला कोणताच मुद्दा नाही. तेंव्हा आरक्षणाचा मुद्दा चर्चेला आणून मराठा ओबीसीत वाद लावले जात असल्याचा आरोप
Sushma Andhare
Sushma AndhareSaam tv
Published On

संजय सूर्यवंशी 
नांदेड
: मराठा आणि ओबीसी वादाचा फायदा भाजपाला होणार आहे. मनोज जरांगे पाटील जी भुमिका घेतात, त्यामूळे ओबीसी भयभीत होतात आणि भयभीत ओबीसींना आम्ही अभय देतो असे फडवणीस म्हणतात. त्यामुळे (BJP) भाजपाला फायदा होत असल्याचे सुषमा अंधारे म्हणाल्या. राज्यातील सर्वच प्रश्नांवर भाजपा अपयशी ठरली. त्यांच्याकडे प्रचाराला कोणताच मुद्दा नाही. तेंव्हा आरक्षणाचा मुद्दा चर्चेला आणून मराठा ओबीसीत वाद लावले जात असल्याचा (Sushma Andhare) आरोप सुषमा अंधारे यांनी केला . (Maharashtra News)

Sushma Andhare
Kartiki Ekadashi Mahapuja : कार्तिकीच्या शासकीय महापूजेला कोळी समाजाचाही विरोध‌

उद्धव ठाकरे शिवसेना गटाच्या नेत्या सुषमा अंधारे या आज नांदेड येथे आल्या असता, त्यांनी सत्तेत असलेल्या भाजपवर टीका केली. मराठा आरक्षणाबाबत बोलताना त्यांनी छगन भुजबळ यांनी केलेल्या भाषणावर देखील निशाणा साधत भुजबळ यांच्यावर टीका केली आहे. तसेच  महविकास आघाडीत लोकसभा जागा वाटपाबाबत चर्चा सुरू आहे. कोणताही निर्णय झाला नाही. आमचा पक्ष आणि घटक पक्षात चर्चा सुरू असल्याचे सुषमा अंधारे म्हणाल्या.


('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Sushma Andhare
Akola Crime News : अकोला हादरले; अकरा वर्षीय मुलीवर अत्याचार करत दिले चटके, नराधमाला अटक

मंत्री मंडळ विस्ताराची गोगावले यांची भाबळी आशा - अंधारे
मंत्रीमंडळ विस्तार होणार असल्याचे आमदार भरत गोगावले म्हणाले. त्यावरून सुषमा अंधारे यांनी गोगावले यांना चिमटा काढला. गोगावले यांच्याबद्दल मला सहानुभुती आहे. पण वाईट देखील वाटतं आहे. मंत्री मंडळाचा विस्तार होईल या आशेने गोगावले यांनी शपथविधीसाठी कोट पण शिवला आहे. आता तो कोट कुठे अमेझॉनवर विकायचा का असा चिमटा अंधारे यांनी काढला. मंत्री मंडळ विस्तार ही त्यांची भाबळी आशा आहे. दादा आता तरी भाजपाच्या भामटेपनावरचा विश्वास कमी करा असा सल्ला अंधारे यांनी दिला.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com