Bypoll Results 2023: उत्तर प्रदेश अन् पश्चिम बंगालमध्ये भाजपला झटका; ७ पैकी ४ जागा इंडिया आघाडीनं जिंकल्या

Bypoll Results 2023: झारखंडच्या डुमरी, केरळमधील पुथुपल्ली, त्रिपुराच्या धनपूर, बॉक्सापनगर आणि युपीतील घोसी, उत्तराखंडमधील बागेश्वर आणि पश्चिम बंगालमधील धूपगडी येथे झालेल्या पोटनिवडणुकीचा निकाल लागलाय.
Bypoll Results 2023
Bypoll Results 2023Saam tv
Published On

Bypoll Results 2023:

सहा राज्यांच्या सात जागेसाठी झालेल्या पोटनिवडणुकीचा निकाल आज लागला. या निवडणुकीत भाजपला मोठा फटका बसलाय. सातपैकी फक्त तीन ठिकाणी भाजपला विजय मिळवता आलाय, यामुळे हा निकाल भाजपचे डोळे उघडवणारा ठरला. ७ झारखंडमधील डुमरी, केरळातील पुथुपल्ली, त्रिपुरातील धनपूर, बॉक्सानगर, उत्तर परदेशातील घोसी, उत्तराखंडातील बागेश्वर आणि पश्चिम बंगालच्या धूपगुडी या सात जागांवर पोटनिवडणूक झाल्या होत्या. यात इंडिया आघाडीच्या पक्षांचा विजय मिळालाय. (Latest marathi News)

सात जागांपैकी तीन जागांवर भाजपला विजय मिळालाय. तर समाजवादी पक्ष, काँग्रेस, झारखंडमधील मुक्ती मोर्चा आणि पश्चिम बंगालमधील तृणमूल काँग्रेसला एक-एक जागा मिळालीय. निवडणूक आयोगानुसार, डुमरी या जागेवर जेएमएमचे उमेदवार बेबी देवी यांचा विजय झालाय. त्या १ लाख ३१७ मताधिक्यांनी विजयी झाल्या.

तर ऑल झारखंड स्टुडेट्स यूनियनचे उमेदवार यशोदा देवी ह्यांना ८३ हजार १६४ मते मिळाली. बेबी देवी यांनी योशदा देवी यांना तब्बल १७ हजार १५३ मतांनी पराभूत केलं. असदुद्दीन ओवैसीची एआयएमआयएम (AIMIM)चे उमेदवार अब्दुल मोबीन रिजवी यांना 3 हजार ४७२ मते मिळाली.

त्रिपुराच्या बॉक्सानगर आणि धनपूरच्या जागेवर झालेल्या पोटनिवडणुकीत भाजपला विजय मिळालाय. बॉक्सानगरचे तफ्फजल हुसैन जिंकले आहेत. तर धनपूरमधून बिंदू देबनाथ यांचा विजय झालाय.

तप्फजल हुसैन यांना ३४ हजार १४८ मते मिळाली. तर मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे उमेदवार मिजान हुसैन यांना ३ हजार ९०९ मते मिळाली. धनपूरचे उमेदवार बिंदू देबनाथ ३० हजार १७ मते मिळाली

केरळमध्ये पुथुपल्ली येथे पोटनिवडणूक झाली. येथे काँग्रेसचे उमेदवार चांडी ओमन यांचा ३७ हजार ७१९ मतांच्या अंतरांनी विजय झाला. त्यांना ८० हजार १४४ मते मिळाली. सीपीआयचे जॅक सी थॉमस यांना ४२ हजार ४२५ मते मिळाली. या ठिकाणी भाजप उमेदवार लिगीन लालचा दारुण पराभव झाला.

उत्तर प्रदेशातील घोसी या जागेसाठी झालेल्या पोटनिवडणुकीत भाजपचा पराभव झालाय. अखिलेश यादव याच्या समाजवादी पक्षाचे उमेदवार सुधारकर सिंह यांचा विजय झालाय. सुधारकर सिंह यांना १ लाख २४ हजार ४२७ मते मिळाली. तर भाजपचे उमेदवार दारासिंह चौहान यांना ८१ हजार ६६८ मते मिळाली.

पश्चिम बंगालमध्ये धूपगडी येथे झालेल्या पोटनिवडणुकीत भाजपचा पराभव झालाय. तृणमूल काँग्रेसचे उमेदवार निर्मल चंद्र रॉय यांचा विजय झालाय. निर्मल चंद्र रॉय यांनी भाजपच्या उमेदवार तापसी रॉय यांना ४ हजार मतांच्या फरकांनी पराभूत केलं.

उत्तराखंडच्या बागेश्वर या जागेसाठी झालेल्या पोटनिववडणुकीत भाजपचे उमेदवार पार्वती दासला ३३ हजार हजार २४७ मते मिळालीत. तर काँग्रेसचे उमेदवार बसंत कुमार यांना ३० हजार ८४२ मते मिळाली.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com