Pushpa 2 Advance Booking SAAM TV
मनोरंजन बातम्या

Pushpa 2 Advance Booking: 'पुष्पा 2'ची रिलीजपूर्वी रेकॉर्ड ब्रेक कामगिरी, तब्बल 100 कोटींचे ॲडव्हान्स बुकिंग

Pushpa 2 : अल्लू अर्जुनच्या 'पुष्पा 2' चित्रपटाने ॲडव्हान्स बुकिंगमध्ये 100 कोटींची कमाई करून रेकॉर्ड ब्रेक कामगिरी केली आहे. या चित्रपटासाठी चाहत्यांचे प्रेम वाढतच जात आहे.

Shreya Maskar

'पुष्पा 2' (Pushpa 2) हा बहुप्रतीक्षित चित्रपट 5 डिसेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाने जगाला वेड लावले आहे. 'पुष्पा 2'ने ॲडव्हान्स बुकिंगमध्येच रेकॉर्ड ब्रेक कामगिरी केली आहे. या चित्रपटाची ॲडव्हान्स बुकिंग (Pushpa 2 Advance Booking) 30 नोव्हेंबरपासून सुरू करण्यात आले होते.

'पुष्पा 2' चित्रपटाची चाहत्यांमध्ये क्रेझ पाहायला मिळत आहे. 'पुष्पा 2'या चित्रपटात मुख्य भूमिकेत अल्लू अर्जुन आणि रश्मिका मंदाना पाहायला मिळणार आहेत. 'पुष्पा 2' चित्रपटाने ॲडव्हान्स बुकिंगमध्ये तब्बल 100 कोटी रुपयांची कमाई केली आहे. हा आकडा सतत वाढताना पाहायला मिळत आहे.

'पुष्पा 2' च्या रेकॉर्ड ब्रेक कामगिरीची माहिती सोशल मीडियाद्वारे देण्यात आली आहे. निर्मात्यांनी सोशल मीडियावर पोस्ट करून ही आनंदाची बातमी दिली आहे. त्यांनी पोस्टला हटके कॅप्शन दिलं आहे. त्यांनी लिहिलं की,"'पुष्पा २ : द रुल' ने ॲडव्हान्स बुकिंगमध्ये 100 कोटींचा टप्पा ओलांडला...भारतातील सर्वात मोठा चित्रपट रेकॉर्डब्रेक कामगिरी करत आहे." या पोस्टवर चाहते आणि कलाकारांकडून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

'पुष्पा 2' चित्रपटात अल्लू अर्जुन पुष्पाच्या भूमिकेत पाहायला मिळणार आहे. तर रश्मिका मंदाना श्रीवल्लीच्या भूमिकेत आहे. 'पुष्पा 2' चित्रपटातील गाण्यांनी प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले. सोशल मीडियावर फक्त 'पुष्पा 2'च्या गाण्यांचा धुमाकूळ पाहायला मिळत आहे.

'पुष्पा: द राइज' हा 2021 ला प्रेक्षकांच्या भेटाला आला होता. 'पुष्पा ' या चित्रपटाने देखील बॉक्स ऑफिसवर बंपर कमाई केली होती. हा चित्रपट खूप गाजला. आजही 'पुष्पा ' चित्रपटाची हवा पाहायला मिळत आहे.

'पुष्पा 2' चित्रपटाचे दिग्दर्शन सुकुमार यांनी केले आहे. हा चित्रपट हिंदी, तेलगू, तामिळ, कन्नड आणि मल्याळमसह अनेक भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: कल्याणच्या गोविंदवाडी बायपासवरील पुलाची सहा वर्षांत दुरवस्था

Pink Saree: नवविवाहीत स्त्रीयांनी श्रावणात सणासुदींसाठी नेसा 'ही' सुंदर गुलाबी साडी

Lonavala-Khandala Tourism: 'या' विकेंडला मस्त भिजायचंय? लोणावळा-खंडाळ्यातील 'या' धबधब्यांची नाव आताच नोट करा

Shefali Jariwala Property: शेफाली जरीवालाची एकूण संपत्ती किती? वारसदार कोण?

Sri Krishna Janmbhoomi Mathura: ईदगाह 'वादग्रस्त वास्तू' नाहीये; उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय

SCROLL FOR NEXT