Swapnil Joshi Car Video : स्वप्नील जोशीने खरेदी केली आलिशान कार; किंमत ऐकून डोळे भिरभिरतील, पाहा पहिली झलक

Swapnil Joshi New Car Price : मराठी अभिनेता स्वप्नील जोशीने नुकतीच आलिशान गाडी खरेदी केली आहे. गाडीची किंमत जाणून घ्या.
Swapnil Joshi New Car Price
Swapnil Joshi Car VideoSAAM TV
Published On

मराठी मनोरंजन सृष्टी गाजवणारा अभिनेता स्वप्नील जोशी नेहमीच त्याच्या कामामुळे चर्चेत असतो. त्याने आपल्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर घर केले आहे. सध्या त्याच्या नवीन कारची (Swapnil Joshi New Car) चर्चा सोशल मीडियावर चांगलीच रंगली आहे.

अभिनेता स्वप्नील जोशीने (Swapnil Joshi) नुकतीच आलिशीन गाडी खरेदी केली आहे. त्याने ही आनंदाची बातमी इंस्टाग्रामवर व्हिडीओ शेअर करून चाहत्यांना दिली आहे. त्यांच्या गाडीची पहिली झलक पाहताच सर्वांचे डोळे भिरभिरले आहेत. गाडीचा लूक प्रेमात पाडणारा आहे.

स्वप्नील जोशीने आपल्या कुटुंबासोबत घरातील नव्या पाहुणीचे स्वागत केले आहे. नवीन गाडी घेण्यासाठी घरातील कुटुंब त्याच्यासोबत होते. त्यांनी जबरदस्त डिफेंडर कार खरेदी केली आहे. स्वप्नीलच्या नव्या कारच्या पोस्टवर चाहत्यांकडून कमेंट्सचा वर्षाव होत आहे. कलाकार आणि चाहते शुभेच्छांचा पाऊस पाडत आहेत.

स्वप्नीलने या पोस्टला भन्नाट कॅप्शन दिले आहे. "स्वप्नपूर्ती...माझी नवीन गाडी" असे त्याने कॅप्शनमध्ये म्हटले आहे. तसेच खाली आपल्या मनातील भावना व्यक्त केल्या आहेत.गाडी खरेदी करताना शोरूमच्या लोकांनी सुंदर सजावट केली होती. स्वप्नीलचे आणि त्याच्या चित्रपटाचे फोटो त्यांनी लावले होते. या सजावटीने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले आहे.

स्वप्नीलच्या नव्या गाडीची किंमत?

अभिनेता स्वप्नील जोशीने Jaguar I-Pace ही आलिशान कार खरेदी केली आहे. ज्याची किंमत कोटींच्या घरात आहे. स्वप्नीलने खरेदी केलेल्या आलिशान कारची किंमत तब्बल 1.12 कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे. ही एका लक्झरी कार आहे.

स्वप्नील जोशीने आजवर अनेक हिट चित्रपट केले आहेत. त्याने आपल्या अभिनयाने महाराष्ट्राला वेड लावले आहे. त्याला मराठी मनोरंजन सृष्टीत 'मितवा' या नावाने ओळखले जाते. त्याचा मोठा चाहता वर्ग आहेत. त्याने आजवर दुनियादारी, तू ही रे, प्यारवाली लव्हस्टोरी असे अनेक भन्नाट चित्रपट केले आहे. तसेच त्याने अनेक दिग्गज कलाकारांसोबत काम केले आहे. स्वप्नील नुकताच 'नवरा माझा नवसाचा 2'मध्ये झळकला होता.

Swapnil Joshi New Car Price
Sunil Pal : बेपत्ता सुनील पाल २४ तासांत सापडले; बायकोने दिली मोठी अपडेट, म्हणाली...

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com