सध्या सर्वत्र 'पुष्पा 2' ची (Pushpa 2) हवा पाहायला मिळत आहे. सर्वत्र चाहते 'पुष्पा 2' ची आतुरतेने वाट पाहत आहेत. 'पुष्पा 2' हा या वर्षाचा बहुप्रतीक्षित चित्रपट आहे. आता हा चित्रपट 5 डिसेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
'पुष्पा 2' चित्रपटाचे ॲडव्हान्स बुकिंग 30 नोव्हेंबरपासून सुरू झाले होते. मीडिया रिपोर्टनुसार, आता पर्यंत 'पुष्पा 2'चित्रपटाने पाचही भाषांमध्ये पहिल्या दिवसासाठी सुमारे 22 कोटी रुपयांच्यावर प्री-सेल्स बुकिंग केली आहे. 'पुष्पा 2' या चित्रपटाने रिलीज होण्याआधीच तब्बल 1085 कोटींच्यावर एकूण कलेक्शन केल्याचं म्हटलं जात आहे.
'पुष्पा 2'च्या वाढत्या प्रतिसादामुळे चित्रपट पहिल्याच दिवशी बंपर कमाई करेल असे म्हटले जात आहे. 'पुष्पा 2'चित्रपटाचे पहिल्या काही काळात तिकिट खूप महाग असणार आहे. मीडिया रिपोर्टनुसार,दिल्लीत 'पुष्पा 2'चित्रपटाचे सगळ्या महाग तिकीट विकलं जात आहे. तेथे एका तिकिटाची किंमत तब्बल 2400 रुपयांपर्यंत आहे. तर मुंबईत 'पुष्पा 2'चित्रपटाचे तिकीट 1600 - 1800 एवढे आहे. बंगळुरूमध्ये 1000 असा तिकीटाचा दर आहे.
'पुष्पा 2' सिनेमातील गाण्यांनी चाहत्यांना वेड लावले आहे. या चित्रपटाने रिलीज आधीच रेकॉर्डब्रेक यश मिळवले आहे. अल्लू अर्जुन आणि रश्मिकाने चित्रपटाचे प्रमोशनही जबरदस्त केले आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.