South Indian Star : दाक्षिणात्य कलाकारांना मुंबईची भुरळ, रश्मिका मंदानासह 'या' सेलिब्रिटींनी घेतले आलिशान फ्लॅट

Mumbai Real Estate : दाक्षिणात्य कलाकार मुंबईत घर खरेदी करण्यावर जास्त भर देताना पाहायला मिळत आहे. कोणत्या दाक्षिणात्य कलाकारांनी मुंबईत घर घेतले आहे, जाणून घ्या.
Mumbai Real Estate
South Indian Star SAAM TV
Published On

मुंबईत स्वतःचे घर असावे असे प्रत्येकाचे स्वप्न असते. या वर्षात दिवाळीमध्ये अनेक कलाकारांनी मुंबईत आपले स्वतःचे हक्काचे घर खरेदी केल आहे. तसेच जगातील प्रत्येक कानाकोपऱ्यातील लोकांना मुंबईमध्ये स्वतःची प्रोपर्टी खरेदी करायची असते.

बॉलिवूड कलाकारांनी एक ते दीड वर्षात मुंबईत ४०० कोटी रुपयांपेक्षा जास्त गुंतवणूक रिअल इस्टेटमध्ये केली आहे. तर आता दाक्षिणात्य कलाकारांनी (South Indian Star) देखील मुंबईची भुरळ लागली आहे. दक्षिणेतील अनेक मोठे कलाकारांनी मुंबईत घरामध्ये गुंतवणूक केली आहे. यामध्ये सेलिब्रिटी, निर्माते आणि दिग्दर्शक यांचा समावेश आहे. काहींनी घराची तर काहींनी कार्यालासाठी जागा खरेदी केली आहे. अनेक बॉलिवूड कलाकारांची घरे पाली हिल सारख्या आलिशान परिसरात आहे. येथे प्रति चौरस फूट दर एक लाख रुपयांच्यावर आहे.

पृथ्वीराज सुकुमारन

मल्याळी सुपरस्टार अभिनेता पृथ्वीराज सुकुमारन यांनी पाली हिलमध्ये स्वतःचा हक्काचा आलिशान घर खरेदी केले आहे. हा फ्लॅट २९७० चौरस फुटाचा आहे. तसेच या फ्लॅटचा किंमत ३० कोटी ६० लाख आहे. तसेच त्यांनी यापूर्वी देखील मुंबईत ७ कोटींचा फ्लॅट खरेदी केला आहे. दाक्षिणात्य चित्रपट निर्मात के.ई. गणावेल राजा यांनी अंधेरी पश्चिमेला १५ कोटी रुपयांना आलिशान फ्लॅट खरेदी केला आहे. हा आलिशान फ्लॅट ३४१४ चौरस फुटाचा आहे.

आर.माधवन

आर.माधवन हा दक्षिणेतील लोकप्रिय अभिनेता आहे. त्यांनी बॉलिवूडमध्ये स्वतःची विशेष ओळख तयार केली आहे. त्याने अनेक हिट चित्रपट दिले आहेत. आर.माधवनचा वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्समध्ये मोठा आलिशान फ्लॅट आहे. ज्याची किंमत तब्बल १७ कोटी ५० लाख रुपये एवढी आहे. हा फ्लॅट ४१८२ चौरस फूट आहे.

रश्मिका मंदाना

दाक्षिणात्य अभिनेत्री रश्मिका मंदाना (Rashmika Mandanna) नेहमीच आपल्या क्यूट स्माईलने चाहत्यांना भुरळ घालत असते. तिने आजवर अनेक सुपरहिट चित्रपट दिले आहेत. तिचा देखील मुंबईत कोट्यवधी रुपयांचा आलिशान फ्लॅट आहे. तसेच दाक्षिणात्य अभिनेत्री समांथा रुथ प्रभूने देखील मुंबईत कोट्यवधींचे घर खरेदी केले आहे.

कोरोनानंतर मुंबईत बांधकामाला वेग आला आहे. गेल्या तीन वर्षांपासून घराच्या किंमती प्रत्येक वर्षाला वाढत आहेत. प्रत्येक वर्षाला सरासरी १० टक्क्यांनी घरांच्या किंमतीत वाढ होत आहे.

Mumbai Real Estate
Prajakta Mali : 'फुलवंती'ची OTT वर रेकॉर्ड ब्रेक कामगिरी; चक्क हॉलिवूडला टाकलं मागे, प्राजक्ता माळीने चाहत्यांचे मानले आभार

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com