Rashmika Mandanna Diet : नॅशनल क्रश 'रश्मिका मंदाना' इतकी फिट कशी? 'ग्लो'चं रहस्य काय?

National Crush Rashmika Mandanna : आपल्या एका स्माईलने चाहत्यांना घायाळ करणारी श्रीवल्ली नेहमी फिट आणि ब्युटिफुल दिसत असते. तिच्या या हेल्दी शरीराचे आणि सौंदर्यचे सीक्रेट जाणून घेऊयात.
National Crush Rashmika Mandanna
Rashmika Mandanna DietSAAM TV
Published On

साउथची सुप्रसिध्द अभिनेत्री रश्मिका मंदान्ना (Rashmika Mandanna) नेहमीच तिच्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर जादू करते. रश्मिका नॅशनल क्राश म्हणून ओळखली जाते. रश्मिकाचा मोठा चाहता वर्ग आहे. रश्मिका मंदान्ना सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. आपल्या विविध लूक, फिटनेस, वैयक्तिक आयुष्यातील अपडेट, नवीन प्रोजेक्टची माहिती आपल्या चाहत्यांसोबत नेहमीच शेअर करत असते. रश्मिकाने अनेक सुपरहिट चित्रपट दिले आहे. तिच्या लूक आणि फिटनेसवर चाहते नेहमी फिदा असतात. रश्मिका व्यायामाचे अनेक व्हिडीओ शेअर करत असते.

पुष्पा चित्रपटात सुप्रसिध्द श्रीवल्ली स्वत:ला फिट आणि सुंदर ठेवण्यासाठी नेहमी डाएट, योगा, व्यायाम करते. तिच्या डाएटचे (Rashmika Mandanna Diet Plan) व्हिडीओ सोशल मिडियावर व्हायरल होत असतात. या व्हिडिओंमध्ये रश्मिका वर्कआउट करताना पाहायला मिळाली आहे. तिचे हे फिटनेस प्रेम पाहून चाहते नेहमीच तिच्यावर खुश असतात.

अनेकांना फिट आणि ब्युटिफुल दिसायच आहे. तिच्या या हेल्दी शरीराचे रहस्य जाणून घेऊया. रश्मिका आपल्या डाएट आणि फिटनेस बद्दल नेहमी मुलाखतीत किंवा सोशल मीडियाच्या माध्यमातून बोलत असते. रश्मिका स्वत:च्या निरोगी त्वचेसाठी अनेक गोष्टी करते. ती नियमित व्यायाम करते. ती वर्कआउटमध्ये स्ट्रेचिंग , वेट ट्रेनिंग, कार्डिओ करते. तसेच ती योगा, चालणे, पोहणे, यांसारख्या गोष्टी करते.

अभिनेत्री घरी असल्यावर पॅावर योगा, चालणे, पोहणे, किकबॉक्सिंग यांसारख्या इतर गोष्टी देखील करते. अभिनेत्री फिटनेस सोबतच आपल्या डाएटकडे देखील खूप लक्ष देते. रश्मिका तिच्या आहारात सर्व पौष्टिक घटकांचा समावेश करत असते. ती सकाळी उठल्यावर सर्वप्रथम पाणी पिते. त्यानंतर ती ॲपल सायडर व्हिनेगर पिते. रश्मिका सकाळच्या नाश्त्याला ओट्स, अंडी यांचे सेवन करते. रश्मिका तिच्या डाएट प्लानमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे सूप घेत असते. तसेच ती नियमित नारळाच्या पाण्याचे सेवन करते. रश्मिका जंक फूड, भात, तळलेले पदार्थ खाणे टाळते. तिला घरचे पदार्थ , जेवण खायला आवडते.

रश्मिका कोणत्याही भूमिकेत जीव ओतते. तिच्या या फिटनेसमुळे ती ब्युटिफुल आणि हेल्दी राहते. रश्मिका योगा आणि मडिटेशन करून आपले शरीर आणि मानसिक आरोग्य उत्तम ठेवते.

National Crush Rashmika Mandanna
Bigg Boss 18 मध्ये सर्वाधिक मानधन घेणारा स्पर्धक कोण? टिव्ही गाजवणाऱ्या अभिनत्याने घेतले ५ कोटी

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com