Nora Fatehi saam tv
मनोरंजन बातम्या

Nora Fatehi : 'घाणेरडे लिरिक्स, डान्स अन्...' ; अश्लीलतेच्या सर्व मर्यादा ओलांडल्या, नोरा फतेही-संजय दत्तच्या गाण्याने संताप

Nora Fatehi - Sarke Chunar Teri Sarke Song : सुपरडान्सर नोरा फतेही तिच्या नवीन गाण्यामुळे चांगलीच ट्रोल होत आहे. नेटकऱ्यांनी तिच्या गाण्याला अश्लील म्हटले आहे. ज्यामुळे नवीन वाद सुरू झाला आहे.

Shreya Maskar

'केडी-द डेविल' चित्रपटात नोरा फतेही आणि संजद दत्त एकत्र दिसणार आहे.

चित्रपटातील 'सरके चुनर तेरी सरके' गाणे रिलीज झाले आहे.

गाण्याच्या डान्स स्टेप आणि लिरिक्समुळे नेटकऱ्यांनी गाण्याला अश्लील म्हटले आहे.

प्रसिद्ध गायक बादशाह त्याच्या 'ततेरी' या गाण्यावरून चांगलाच चर्चेत आहे. या गाण्यातील अश्लीलतेमुळे वाद सुरू झाला आहे. अशात आता आपल्या डान्सने जगाला वेड लावणारी नोरा फतेही चांगलीच वादाच्या भोवऱ्यात अडकली आहे. तिचे नुकतेच नवीन गाणे रिलीज झाले आहे. ज्यामुळे तिला प्रचंड ट्रोल केले जात आहे. नोरा फतेही गाण्यामध्ये संजय दत्तसोबत दिसत आहे. लवकरच नोरा आणि संजय दत्त 'केडी - द डेव्हिल' चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटातील 'सरके चुनर तेरी सरके' गाणे रिलीज झाले आहे.

नोरा फतेहीच्या 'सरके चुनर तेरी सरके' गाण्यात अश्लील शब्द तसेच अश्लील डान्स स्टेप्स पाहायला मिळत आहेत. सुरुवातीला गाणे खूप छान असते. मात्र शेवटच्या भागात खूप अश्लीलता पाहायला मिळत आहे. गाण्याच्या लिरिक्समध्ये असभ्यता दिसत आहे. तसेच गाण्यात घाणेरड्या स्टेप्स बसवल्या आहेत. नोराचे पल्लू-ड्रॉपिंग स्टेप असो किंवा संजय दत्तची हुक डान्स स्टेप यामुळे गाणे खूपच अश्लील झाले आहे. ज्यामुळे सोशल मीडियावर याची चांगली चर्चा पाहायला मिळत आहे. नोरा गाण्यात तिचा हॉटनेस दाखवते, तर संजय दत्त त्याची खलनायकी बाजू दाखवतो.

'सरके चुनर तेरी सरके' गाण्याचे संगीत दिग्दर्शक अर्जुन जान्या आहेत. गीत रकीब आलम यांनी लिहिले आहे आणि हे गाणे गायक मंगली यांनी गायले आहे. चित्रपटाचे दिग्दर्शन प्रेम यांनी केले आहे. चित्रपटात ध्रुव सरजा, शिल्पा शेट्टी, संजय दत्त, व्ही. रविचंद्रन आणि नोरा फतेही यांच्यासह कलाकार झळकणार आहेत. हे गाणे पाहताच नेटकऱ्यांचा संताप उडाला आहे. एका युजरने लिहिलं की, "घाणेरडे लिरिक्स आणि डान्स आहे...", दुसऱ्या युजरने लिहिलं की, "अश्लीलतेच्या सर्व मर्यादा ओलांडल्या..." तिसऱ्या युजरने लिहिलं की, "भोजपुरी गाण्यांना मागे टाकले..."

अरमान मलिक नाराज

प्रसिद्ध गायक अरमान मलिकनेही या गाण्यावर आपली नाराजी व्यक्त केली आहे. एक्स (पूर्वीचे ट्विटर) वर लिहिले की, "हे माझ्या टाइमलाइनवर दिसले आणि मी जे ऐकले ते बरोबरच होते ना, याची खात्री करण्यासाठी मला ते पुन्हा पाहावे लागले. व्यावसायिक गीतलेखनाचा दर्जा इतक्या खालच्या पातळीवर घसरलेला पाहून खरोखरच वाईट वाटते." त्याच्या दुसऱ्या ट्विटमध्ये त्याने पुढे म्हटले, "मला खरोखरच काय बोलावं हे सुचत नाहीये. हे ऐकलेलंच नसतं, तर किती बरं झालं असतं!"

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Actor Death : मनोरंजन सृष्टीवर शोककळा! ज्येष्ठ अभिनेत्याचे मुंबईत निधन

Maharashtra ST Bus: ... तर एसटी बसमधील अर्ध्या तिकीटावरचा प्रवास होणार बंद, आत्ताच करा हे काम

Maharashtra News Live Update: दीड तास लिफ्टमध्ये अडकलेल्या चार तरुणांची खारघर अग्निशमन दलाकडून थरारक सुटका

पावसाळ्यात कपड्यांचा कुबट वास येतो? या समस्येपासून कशी कराल सुटका?

वटपौर्णिमेला बायकोला द्या सरप्राईज गिफ्ट, वाटी मंगळसूत्राच्या एकापेक्षा एक सुंदर डिझाईन्स

SCROLL FOR NEXT