Nora Fatehi : "मोठी किंमत मोजावी लागेल..."; नोरा फतेही संतापली, ड्रग्ज प्रकरणात अभिनेत्रीनं सोडले मौन

Nora Fatehi On Drug Party : बॉलिवूडची सुपरडान्सर आणि अभिनेत्री नोरा फतेहीचे नाव ड्रग्ज प्रकरणात पुन्हा समोर आले आहे. मात्र यावेळी तिने आरोप करणाऱ्यांना सडेतोड उत्तर दिले आहे. ती नेमकं काय म्हणाली, जाणून घेऊयात.
Nora Fatehi On Drug Party
Nora FatehiSAAM TV
Published On
Summary

ड्रग्ज प्रकरणामध्ये बॉलिवूडच्या मोठ्या कलाकारांची नावे आहेत.

मुंबईत पुन्हा एकदा बॉलिवूडच्या सिनेतारकांची ड्रग्ज पार्टी झाली.

नोरा फतेहीने ड्रग्ज प्रकरणात आपले नाव घेतल्यामुळे संताप व्यक्त केला आहे.

बॉलिवूड ड्रग्ज प्रकरणामुळे चांगलेच चर्चेत आले आहे. अलिकडेच मुंबईत पुन्हा एकदा बॉलिवूडच्या सिनेतारकांची ड्रग्ज पार्टी झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली. दाऊदच्या टोळीशी संबंधित आंतरराष्ट्रीय ड्रग्ज सिंडिकेटचा मुंबईत पर्दाफाश करण्यात आला. ड्रग्ज रॅकेटशी संबंधित आरोपी मोहम्मद सलीम शेखला दुबईतून भारतात आणण्यात आले. शेखनेच बॉलिवूडमधील कलाकरांना अंमली पदार्थ पुरवल्याची माहिती पोलिसांनी दिली.

पोलिसांनी न्यायालयात सादर केलेल्या माहितीनुसार, श्रद्धा कपूर, तिचा भाऊ सिद्धार्थ कपूर, नोरा फतेही (Nora Fatehi ), ओरहान अवत्रामणी ऊर्फ ओरी, अंडरवरल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा भाचा अतिशाह पारकर, अब्बास-मस्तान यांच्यासह अनेक सेलिब्रिटीचा ड्रग्ज पार्टीत समावेश होता. आता या प्रकरणात बॉलिवूड अभिनेत्री आणि डान्सर नोरा फतेहीने संताप व्यक्त करून सर्व आरोपाचे खंडन केलं आहे. तिने यासंबंधित पोस्ट सोशल मीडियावर केली आहे. तिची ही पोस्ट इंटरनेटवर तुफान व्हायरल होत आहे.

नोरा फतेहीची पोस्ट

"मी पार्ट्यांमध्ये जात नाही. मी सतत विमान प्रवास करतो. मी कामावर प्रेम करते. माझे वैयक्तिक आयुष्य नाही. मी स्वतःला अशा लोकांशी जोडत नाही. आणि माझ्या सुट्टीच्या दिवशी मी दुबईतील समुद्रकिनाऱ्यावर किंवा माझ्या हायस्कूलच्या मित्रांसोबत असते. मी माझा संपूर्ण दिवस आणि रात्र माझ्या स्वप्नांवर आणि ध्येयांवर काम करत असते. तुम्ही जे काही वाचता त्यावर विश्वास ठेवू नका. असे दिसते की, माझे नाव सहजरित्या टार्गेट केले जाते. पण यावेळी मी ते होऊ देणार नाही. हे आधी एकदा घडले होते. तुम्ही लोकांनी खोटे बोलून माझे करिअर आणि मला संपवण्याचा प्रयत्न केला होता. मात्र ते तेव्हा शक्य झाले नाही. मी शांतपणे पाहत होते, जेव्हा प्रत्येकजण माझे नाव बदनाम करण्याचा, माझी प्रतिष्ठा कलंकित करण्याचा आणि मला क्लिकबेट म्हणून वापरण्याचा प्रयत्न करत होते. माझा कोणताही संबंध नसलेल्या गोष्टीशी माझे नाव जोडण्याचा, फोटो वापरण्याचा प्रयत्न करू नका. यापासून कृपया दूर रहा. नाहीतर याची मोठी किंमत मोजावी लागेल! आदरपूर्वक"

nora fatehi
nora fatehiinstagram

बॉलिवूडमधील कलाकारांच्या या ड्रग्ज पार्ट्या दुबई आणि गोवामध्ये झाल्याचेही समोर आले आहे. या पार्टीत सलीम शेख स्वत:सहभागी होता. नोरा फतेही तिच्या नावाचा गैरवापर केल्यास त्या व्यक्तीवर योग्य ती कारवाई केली जाईल. याचा इशारा दिला आहे. नेटकरी देखील नोरा फतेहीच्या पोस्टवर कमेंट्स करत आहे. पोलीस या प्रकरणाची चौकशी करत आहेत.

Nora Fatehi On Drug Party
Shah Rukh Khan : शाहरुख खानच्या नावाची दुबईमध्ये 56 मजली इमारत, किंमत वाचून डोळे विस्फारतील

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com