'पेपीटा', 'डर्टी लिटिल सीक्रेट' आणि जेसन डेरुलोसोबतचा व्हायरल ट्रॅक 'स्नेक' सारखी जागतिक हिट गाणी दिल्यानंतर आंतरराष्ट्रीय आयकॉन नोरा फतेही (Nora Fatehi ) आता संगीताच्या एका नवीन पर्वाला सुरुवात करत आहे. यावेळी फक्त नोरा परफॉर्म करणार नसून भारताची स्वरसम्राज्ञी श्रेया घोषालसोबत ( Shreya Ghoshal) गाणे देखील गाणार आहे. टी-सीरीजच्या बॅनरखाली हे रोमांचक क्रॉस-कल्चरल व्होकल कोलॅबोरेशन ( cross cultural vocal track) चांगलेच चर्चेत आहे.
आजवर श्रेया घोषालने आपल्या गाणाने आणि नोरा फतेहीने हटके डान्सने चाहत्यांचे मनोरंजन केले आहे. नोरा-श्रेयाची जोडी स्टेजवर येते आणि आपल्या सुरेल आवाजाने धुमाकूळ घालते. तिच्या मोहक स्क्रीन प्रेझेन्ससाठी ओळखली जाणारी नोरा तिच्या गोड गळ्याने प्रेक्षकांना घायाळ करते. बॉलिवूडची मेलोडी क्वीन श्रेया घोषालसोबत नोरा फतेही गाणे गाते.
पिढ्यान् पिढ्या भारतीय संगीतात आपला ठसा उमटवणारी श्रेया घोषाल या गाण्याला आपल्या सुरेल आवाज आणि गोड गळ्याने चारचाँद लावते. विविध प्रकारच्या संगीत शैलींमध्ये सहजतेने रुळणारी तिची श्रेयाची कला नोराच्या ठाम- आधुनिक आवाजामुळे एका जागतिक रंगतदार रूपात सादर होते. जे ऐकायला लय भारी वाटते.
नोरा फतेही आणि श्रेया घोषालचा हा गाण्याचे क्रॉस-कल्चरल व्होकल कोलॅबोरेशन आकर्षण आहे. यातून एक जेनर-ब्लेंडिंग अँथम तयार झाला आहे. नोरा आणि श्रेया दोघींच्या आवाजामुळे हे गाणे फक्त एक कोलॅबोरेशन न राहता एक कलात्मक कृती बनते. भव्य व्हिजुअल आणि समृद्ध साउंडस्केप या क्रॉस-कल्चरल संगीत उत्सवाला आणखी उंचीवर नेतात.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.