Shruti Vilas Kadam
धुरंधर हा चित्रपट सध्या धुमाकूळ घालत आहे. आदित्य धर दिग्दर्शित या चित्रपटात रणवीर सिंग, अक्षय खन्ना, संजय दत्त, आर. माधवन आणि अर्जुन रामपाल यांच्या प्रमुख भूमिका आहेत.
बँड बाजा या चित्रपटातून आपल्या कारकिर्दीची सुरुवात करणाऱ्या रणवीर सिंगने पद्मावत, बाजीराव मस्तानी आणि सिम्बा यासारख्या चित्रपटांमध्ये काम केले आहे. रणवीरची एकूण संपत्ती ४०० कोटींपेक्षा जास्त आहे. अभिनेता एका चित्रपटासाठी ३०-५० कोटी रुपये घेतो.
अक्षय खन्नाने १९९७ मध्ये हिमालय पुत्र या चित्रपटातून पदार्पण केले. अक्षयची एकूण संपत्ती १६७ कोटी आहे. त्याच्याकडे जुहू आणि मलबार हिलमध्ये मालमत्ता आहेत. त्याच्याकडे मर्सिडीज-बेंझ एस-क्लास, बीएमडब्ल्यू ५ सिरीज आणि टोयोटा फॉर्च्युनर सारख्या आलिशान कार देखील आहेत.
आर. माधवन हा केवळ एक उत्तम अभिनेता नाही तर निर्माता आणि दिग्दर्शक देखील आहे. माधवनची एकूण संपत्ती ११५ कोटी आहे.
संजय दत्तने १९८१ मध्ये आपल्या कारकिर्दीला सुरुवात केली आणि चार दशकांपासून तो इंडस्ट्रीमध्ये आहे. संजयची एकूण संपत्ती २९५ कोटी आहे.
वृत्तांनुसार, अर्जुन रामपालची एकूण संपत्ती १००-१२० कोटी आहे.
चित्रपटाचे दिग्दर्शक आदित्य धर प्रत्येक चित्रपटासाठी ८-१० कोटी रुपये घेतात. त्यांची आणि यामीची एकत्रित संपत्ती १०० कोटी रुपये आहे.