Shruti Vilas Kadam
काळा रंग उष्णता जास्त शोषून घेतो. त्यामुळे थंडीच्या दिवसांत काळ्या रंगाचे कपडे घातल्यास शरीराला अधिक उब मिळते.
नेव्ही ब्लू हा गडद रंग सूर्यकिरण अधिक प्रमाणात शोषतो. त्यामुळे थंड हवामानात हा रंग शरीर गरम ठेवण्यास मदत करतो.
हिरव्या रंगाचे गडद शेड्स उबदार वाटतात. थंडीत हा रंग डोळ्यांना आरामदायक आणि शरीराला उबदार ठेवणारा ठरतो.
मरून, वाईन यांसारखे रंग उष्णता धरून ठेवतात. शिवाय हे रंग हिवाळी फॅशनमध्ये स्टायलिशही दिसतात.
ब्राऊन रंग नैसर्गिक उबदारपणा देतो. लोकरीच्या किंवा जाड कापडांमध्ये हा रंग थंडीपासून संरक्षण देतो.
डार्क ग्रे रंगही उष्णता शोषण्यात मदत करतो. हलक्या राखाडीपेक्षा गडद राखाडी थंडीत अधिक उपयुक्त ठरतो.
पांढरा रंग उष्णता परावर्तित करतो. त्यामुळे थंडीत पांढऱ्या रंगाचे कपडे घातल्यास शरीराला कमी उब मिळते, म्हणून गडद रंग अधिक योग्य मानले जातात.