Famous Model AI PHOTO
मनोरंजन बातम्या

Famous Model: ट्रेनमध्ये कपडे काढले, RPF कर्मचाऱ्यावर हल्ला केला; प्रसिद्ध मॉडेलला अटक

Thane News : प्रसिद्ध मॉडेलवर एक्सप्रेसमध्ये धिंगाणा घालून TC-RPF कर्मचाऱ्यावर हल्ला देखील केल्याचा आरोप करण्यात आला आहे. नेमकं प्रकरण काय, जाणून घेऊयात.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मनोरंजन विश्वातून खळबळजनक बातमी समोर आली आहे. प्रसिद्ध मॉडेलने तिकीट तपासनीस अधिकाऱ्यावर हल्ला केला आहे. मॉडेल अंतरा सोहम बॅनर्जी (Antara Soham Banerjee) एका वेब सिरीजच्या चित्रीकरणासाठी 'वांद्रे-गंगानगर अरावली एक्सप्रेस'ने सुरतला जात असताना १२ ऑगस्टच्या रात्री कथितरीत्या स्वतःचे कपडे उतरवले आणि रेझर ब्लेडने तिकीट तपासनीस (TC) व आरपीएफ (RPF) कर्मचाऱ्यावर हल्ला केला. ही घटना रात्री ९.३० ते १०.५० या वेळेत घडली.

टाइम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, अंतरा बॅनर्जी ही ठाण्यातील रहिवासी आहे. डहाणू रेल्वे स्थानकावर गाडी आल्यानंतर बॅनर्जी यांना गाडीतून खाली उतरवून रेल्वे पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. दुसऱ्या दिवशी सकाळी बोरिवली रेल्वे पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले आणि इतरांचा जीव धोक्यात घालणे, हल्ला करणे तसेच या घटनेदरम्यान स्वतःला दुखापत करून घेणे या आरोपांखाली त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

एका प्रवाशाने आरक्षित सीटवर बसलेल्या बॅनर्जी यांना जागा सोडण्यास सांगितल्यावर या वादाला सुरुवात झाली. त्यांनी जागा सोडण्यास नकार दिल्यावर त्या प्रवाशाने आरपीएफ आणि तिकीट तपासनीसाला बोलावले. बॅनर्जी यांनी कथितरीत्या आक्रमक पवित्रा घेतला आणि मध्यस्थी करणाऱ्यांना शिवीगाळ केली. बोरिवली जीआरपी (GRP) निरीक्षक कुंदा गावडे म्हणाल्या, "साक्षीदारांनी सांगितले की बॅनर्जी तणावाखाली किंवा अस्वस्थ दिसत होत्या; कारण त्यांना एसी कोचचे तिकीट मिळाले नव्हते आणि त्या स्लीपर क्लासचे तिकीट घेऊन त्या डब्यात आल्या होत्या. जेव्हा अधिकाऱ्यांनी त्यांना नातेवाईकांशी किंवा वकिलाशी संपर्क साधण्यास सांगितले, तेव्हा त्यांनी सहकार्य करण्यास नकार दिला आणि स्वतःला अटक करून घेण्याचा आग्रह धरला. हा प्रकार एका तासापेक्षा जास्त काळ चालला आणि त्यामुळे प्रवासी हादरून गेले होते. एफआयआर (FIR) दाखल झाल्यानंतर त्या शांत झाल्या."

जीआरपीचे वरिष्ठ निरीक्षक पांडरीनाथ कांडे यांनी सांगितले की, "सुरक्षितता धोक्यात आणणे, सरकारी कर्मचाऱ्यांना गंभीर दुखापत करणे, हल्ला करणे आणि जाणीवपूर्वक अपमान करणे या आरोपांखाली बॅनर्जी यांना अटक करण्यात आली होती, परंतु नंतर त्यांची जामिनावर सुटका करण्यात आली. हा एफआयआर १३ ऑगस्ट रोजी दाखल करण्यात आला.

तक्रारीत, आरपीएफच्या एएसआय (ASI) यामिनी कांत मिश्रा यांनी आरोप केला की, तिकीट तपासनीस हरिकेश त्रिपाठी आणि एका सहप्रवाशाने त्यांना व कॉन्स्टेबल राजेश कुमार यांना बॅनर्जी यांनी आरक्षित सीट सोडण्यास दिलेल्या नकाराबद्दल माहिती दिली होती. मिश्रा यांनी सांगितले की, त्यांना शांत करण्याचा प्रयत्न करूनही बॅनर्जी आक्रमक झाल्या; त्यांनी स्वतःचे कपडे उतरवले, ब्लेड फिरवले आणि मिश्रा व स्वतःला दुखापत करून घेतली.

मिश्रा यांच्या तक्रारीनुसार, झटापटीदरम्यान बॅनर्जी यांनी त्यांचा गणवेश आणि मोबाईल खराब केला तसेच त्यांचा चष्मा तोडला. आरपीएफ (RPF) कर्मचाऱ्यांनी वातानुकूलित (AC) डब्याचे दरवाजे बंद केले होते. बाहेर पडण्यासाठी बॅनर्जी यांनी कथितरीत्या काच फोडली आणि गाडी डहाणू येथे पोहोचल्यावर त्यांना जीआरपीच्या (GRP) ताब्यात देण्यात आले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Eknath Shinde: एकनाथ शिंदे पुन्हा मुख्यमंत्री व्हावेत, श्रीकांत शिंदेंनाही मोठं पद मिळावं; देवीच्या चरणी घातलं गाऱ्हाणं

प्रसिद्ध दिग्दर्शकाचा हॉटेल रुममध्ये आढळला मृतदेह; २८ वर्षीय डायरेक्टरच्या निधनाने सिनेसृष्टीत शोककळा

Sunday Horoscope: पैशाची तंगी जाणवेल, 3 राशींचे भाग्य उजळेल; वाचा रविवारचं राशीभविष्य

Durga Puja Pandal: दुर्गा पूजेचा मंडप कोसळला; चेंगराचेंगरीत १७ जणांचा मृत्यू

दिल्लीतील आंदोलनाची धग थेट लंडनपर्यंत, ध्रुव राठीने सांभाळली लंडनमध्ये आंदोलनाची धुरा

SCROLL FOR NEXT