Actress Injured: लाइव्ह परफॉर्मन्सदरम्यान प्रसिद्ध गायिकेवर हल्ला; चेहऱ्यावर गंभीर दुखापत

Actress Injured: पेरूमध्ये लाइव्ह परफॉर्मन्सदरम्यान गायिकेच्यावर काचेची बाटली फेकून हल्ला झाला. चेहऱ्यावर गंभीर जखमा झाल्यानंतर त्यांनी वैद्यकीय तपासणी आणि कायदेशीर कारवाईचा निर्णय घेतला.
Actress Injured
Actress InjuredSaam Tv
Published On

Actress Injured: पेरूमध्ये स्थानिक महोत्सवादरम्यान प्रसिद्ध गायिका सोराया निएटो यांच्यावर काचेची बाटली फेकून हल्ला करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ८ ऑगस्ट रोजी अयाकुचो विभागातील हुआमांगा प्रांताच्या ओक्रॉस जिल्ह्यातील चुंबेस येथे हा प्रकार घडला. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर चाहत्यांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे.

लाइव्ह परफॉर्मन्सदरम्यान हल्ला

सोराया निएटो या स्थानिक महोत्सवात परफॉर्मन्स करत होत्या. त्यावेळी गर्दीत उपस्थित असलेल्या एका व्यक्तीने त्यांच्या दिशेने काचेची बाटली भिरकावली. ही बाटली थेट त्यांच्या चेहऱ्यावर आदळली. सोराया निएटो यांचा परफॉर्मन्स अपेक्षेपेक्षा जास्त वेळ सुरू राहिल्याने संबंधित व्यक्ती संतापला होता, अशी माहिती समोर आली आहे.

Actress Injured
Director Hospitalized: प्रसिद्ध दिग्दर्शकाची प्रकृती गंभीर; रुग्णालयात व्हेंटिलेटरवर उपचार

बाटली आदळल्याने गायिकेच्या चेहऱ्यावर अनेक ठिकाणी जखमा झाल्या. त्यांच्या डाव्या पापणीला दुखापत झाली असून भुवईच्या आसपास सूज आली. तसेच खालच्या ओठाखाली जखम झाली असून त्यावर टाके घालावे लागले. या हल्ल्यात त्यांचा चष्माही पूर्णपणे फुटला. मात्र, फुटलेल्या काचेचे तुकडे डोळ्यांत न गेल्याने मोठी दुखापत टळली.

Actress Injured
Death News: २६वा वाढदिवस साजरा करण्याआधीच काळाचा घाला; प्रसिद्ध मॉडेल-इन्फ्लुएन्सरचं दुर्दैवी निधन

रक्तस्त्राव होत असल्याने मदतीला धावले लोक

‘एल हेराल्डो डी मेक्सिको’च्या वृत्तानुसार, हल्ल्यानंतर निएटो यांच्या चेहऱ्यावरून रक्तस्त्राव होत होता. परिसरातील काही लोक आणि त्यांचे मित्र तातडीने मदतीसाठी पुढे आले. या मदतीबद्दल त्यांनी कृतज्ञता व्यक्त केली. मात्र, त्याच ठिकाणी दुसऱ्या मंचावर परफॉर्मन्स करणाऱ्या काही संगीतकार आणि कलाकारांनी मदतीसाठी पुढाकार घेतला नाही, याबद्दल त्यांनी नाराजी व्यक्त केली.

कायदेशीर कारवाई करणार

या घटनेनंतर सोराया निएटो यांनी दुखापतीनंतर फॉरेन्सिक वैद्यकीय तपासणी करून घेण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच, आपल्यावर झालेल्या शारीरिक हल्ल्याविरोधात आणि चेहऱ्यावरील दुखापतींबाबत संबंधित अधिकाऱ्यांकडे अधिकृत तक्रार दाखल करण्याचा त्यांचा विचार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com