Death News: २६वा वाढदिवस साजरा करण्याआधीच काळाचा घाला; प्रसिद्ध मॉडेल-इन्फ्लुएन्सरचं दुर्दैवी निधन

Putri Andriani: ‘मिस अर्थ इंडोनेशिया २०२५’चा किताब जिंकणाऱ्या पुत्री आंद्रियानी जुफिचा यांचं वयाच्या २५व्या वर्षी निधन झालं. २६वा वाढदिवस साजरा करण्याच्या दिवशीच निधनाची बातमी समोर आली.
 Putri Andriani death News
Putri Andriani death NewsSaam Tv
Published On

Putri Andriani: 'मिस अर्थ इंडोनेशिया २०२५’चा किताब जिंकून चर्चेत आलेल्या पुत्री आंद्रियानी जुफिचा यांचं वयाच्या अवघ्या २५व्या वर्षी निधन झालं. विशेष म्हणजे, १४ ऑगस्ट रोजी ती आपला २६वा वाढदिवस साजरा करणार होती. मात्र, त्याच दिवशी तिच्या निधनाची बातमी समोर आल्याने सौंदर्य स्पर्धेच्या क्षेत्रात हळहळ व्यक्त केली जात आहे.

‘मिस ग्रँड इंडोनेशिया’ संस्थेने शुक्रवारी, १४ ऑगस्ट रोजी जुफिचा यांच्या निधनाची अधिकृत घोषणा केली. संस्थेने सोशल मीडियावर पोस्ट करत तिला श्रद्धांजली वाहिली. जुफिचा या ‘मिस ग्रँड इंडोनेशिया २०२५’ स्पर्धेच्या उपविजेत्याही ठरली होती.

 Putri Andriani death News
Poet Death News: मराठी साहित्याचा आधारस्तंभ हरपला; महाराष्ट्राचे ज्येष्ठ कवी काळाच्या पडद्याआड, साहित्यविश्वात शोककळा

संस्थेने वाहिली श्रद्धांजली

‘मिस ग्रँड इंडोनेशिया’ संस्थेने जुफिचाची निधनाबद्दल दुःख व्यक्त करत त्यांच्या कुटुंबीयाप्रती संवेदना व्यक्त केल्या. संस्थेने म्हटलं की, जुफिचा केवळ सौंदर्य स्पर्धेतील विजेती नव्हती, तर तिने तिच्या शालीन स्वभाव, जिद्द आणि सकारात्मक दृष्टिकोनामुळे अनेकांची मनं जिंकली होती. सौंदर्य स्पर्धेदरम्यान जुफिचाने ‘नॉर्थ सुलावेसी’चं प्रतिनिधित्व केलं होतं. २०२५ मध्ये ‘मिस ग्रँड इंडोनेशिया’ स्पर्धेत सहभागी झाल्यानंतर तिला मोठी ओळख मिळाली. त्यानंतर ‘मिस अर्थ इंडोनेशिया’ म्हणून तिची निवड झाली.

 Putri Andriani death News
Govinda On Affair Rumours: तू लिमिटमध्ये राहा! गोविंदानं बायकोला दिली वॉर्निंग, रुमर्ड गर्लफ्रेंडसोबत व्हिडिओ झाला होता व्हायरल

पर्यावरणासाठीही केलं काम

पुत्री आंद्रियानी जुफिचा ही केवळ सौंदर्यामुळे नव्हे, तर पर्यावरणविषयक कामामुळेही ओळखली जात होती. कचऱ्याचं पुनर्वापर, नद्यांचं प्रदूषण रोखणं आणि स्थानिक समुदायासोबत पर्यावरणाचं संरक्षण करणं यांसारख्या उपक्रमांमध्ये तिने नेहमीच सहभाग घेतला होता. ‘मिस अर्थ’ संस्थेनेही तिच्या पर्यावरणविषयक योगदानाची दखल घेतली होती. सौंदर्य स्पर्धेच्या व्यासपीठाचा वापर करून तिने जीवनशैली, प्रदूषण आणि कचरा व्यवस्थापनाबाबत जनजागृती करण्याचा प्रयत्न केला होता. जुफिचा कायद्याची विद्यार्थिनी होती. त्याशिवाय ती गायिकाही होती. निधनापूर्वीच्या काही महिन्यांपर्यंत ती सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये सक्रिय होती. जून महिन्यात तिने एका आंतरराष्ट्रीय सौंदर्य स्पर्धेत परीक्षकाची जबाबदारीही पार पाडली होती.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com