Director Hospitalized: प्रसिद्ध दिग्दर्शकाची प्रकृती गंभीर; रुग्णालयात व्हेंटिलेटरवर उपचार

Director Hospitalized: प्रसिद्ध बंगाली दिग्दर्शक राजा सेन यांची प्रकृती अचानक खालावल्याने त्यांना कोलकात्यातील SSKM रुग्णालयात दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवले असून विशेष पथक देखरेख करत आहे.
 director raja sen admitted
director raja sen admitted Saam Tv
Published On

Director Hospitalized: प्रसिद्ध बंगाली चित्रपट दिग्दर्शक राजा सेन यांची प्रकृती गंभीर झाल्याची माहिती समोर आली आहे. प्रकृती अचानक खालावल्याने त्यांना कोलकाता येथील सरकारी एसएसकेएम (SSKM) रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ७० वर्षीय राजा सेन यांच्यावर सध्या व्हेंटिलेटरवर उपचार सुरू असून डॉक्टरांची टीम त्यांच्या प्रकृतीवर बारकाईने लक्ष ठेवून आहे. त्यांच्या प्रकृतीबाबतची माहिती समोर आल्यानंतर बंगाली चित्रपटसृष्टीत चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. राजा सेन गेल्या काही वर्षांपासून वयोमानानुसार उद्भवणाऱ्या आरोग्यविषयक समस्यांशी झुंज देत आहेत. शनिवारी त्यांची प्रकृती अचानक बिघडल्याने त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले.

जुन्या दुखापतीमुळे आरोग्याच्या समस्या

राजा सेन यांच्या प्रकृती चित्रपटाच्या सेटवर असताना बिघडायला सुरुवात झाली. काही वर्षांपूर्वी ‘माया मृदंग’ या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान सेटवर पडल्याने त्यांच्या पाठीला गंभीर दुखापत झाली होती. सुरुवातीला ही दुखापत फार गंभीर नसल्याचे त्यांना जाणवले. मात्र, कालांतराने त्याचा परिणाम त्यांच्यावर व्हायला लागला.

 director raja sen admitted
Death News: २६वा वाढदिवस साजरा करण्याआधीच काळाचा घाला; प्रसिद्ध मॉडेल-इन्फ्लुएन्सरचं दुर्दैवी निधन

या वर्षाच्या सुरुवातीला त्यांच्या शरीराच्या खालच्या भागात मोठ्या प्रमाणात अशक्तपणा जाणवू लागला. वैद्यकीय तपासणीनंतर मज्जासंस्थेला ईजा झाल्याचे समजले.त्यानंतर फेब्रुवारी महिन्यात त्यांच्यावर मोठी शस्त्रक्रिया करण्यात आली. शस्त्रक्रियेनंतर त्यांच्या प्रकृतीत काही प्रमाणात सुधारणा झाली होती. मात्र, आता पुन्हा प्रकृती खालावल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

 director raja sen admitted
Govinda On Affair Rumours: तू लिमिटमध्ये राहा! गोविंदानं बायकोला दिली वॉर्निंग, रुमर्ड गर्लफ्रेंडसोबत व्हिडिओ झाला होता व्हायरल

तीन राष्ट्रीय पुरस्कारांनी गौरव

राजा सेन यांनी १९८०च्या दशकात टेलिव्हिजनच्या माध्यमातून आपल्या कारकिर्दीला सुरुवात केली. ‘सुवर्णलता’, ‘आदर्श हिंदू हॉटेल’ आणि ‘आरोग्य निकेतन’ यांसारख्या लोकप्रिय बंगाली मालिकांचे दिग्दर्शन त्यांनी केले. यानंतर त्यांनी चित्रपट दिग्दर्शनाकडे वळत ‘दमु’ या चित्रपटातून पदार्पण केले. या चित्रपटाला सर्वोत्तम बालचित्रपटाचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. संगीतकार सुचित्रा मित्रा यांच्यावरील माहितीपटासाठीही त्यांना राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. ‘आत्मीय स्वजन’ या चित्रपटाला कुटुंब कल्याणावरील सर्वोत्तम चित्रपटाचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. ‘देश’, ‘देवीपक्ष’, ‘खांचा’ आणि ‘माया मृदंग’ यांसारख्या चित्रपटांमधून त्यांनी बंगाली चित्रपटसृष्टीत महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com