स्टार प्रवाह वाहनीवरील (Star Pravah) प्रसिद्ध मालिका 'रंग माझा वेगळा' (Rang Maza Vegala) फेम अभिनेत्री रेश्मा शिंदे (Reshma Shinde) नव्या मालिकेच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. रेश्मा शिंदेची 'घरोघरी मातीच्या चुली' ही मालिका येत्या १८ मार्चपासून स्टार प्रवाहवर पाहायला मिळणार आहे. प्रेक्षकांना ही मालिका सोमवार ते शनिवार संध्याकाळी ७.३० वाजता पाहायला मिळणार आहे. या मालिकेबाबतचे एकएक अपडेट्स जाणून घेण्यासाठी रेश्माचे चाहते खूपच उत्सुक आहेत. या मालिकेबाबत एक महत्वाची अपडेट समोर आली आहे. स्टार प्रवाहची ही मालिका हिंदी मालिकेचा रिमेक असणार आहे.
'घरोघरी मातीच्या चुली' या मालिकेमध्ये रेश्मा शिंदे मुख्य भूमिकेमध्ये दिसणार आहे. ती जानकी रणदिवे हे मुख्य पात्र साकारणार आहे. या मालिकेत अभिनेत्री सविता प्रभुने, बालकलाकार आरोही सांभारे यासह अनेक सहकलाकार दिसणार आहेत. काही दिवसांपूर्वी स्टार प्रवाहने या मालिकेचा प्रोमा शेअर केला होता. त्याला प्रेक्षकांकडून चांगली पसंती मिळाली असून ते या मालिकेची वाट पाहत आहेत. आता या मालिकेबाबत महत्वाची बातमी समोर आली आहे ती म्हणजे ही मालिका २० वर्षे जुन्या हिंदी मालिकेचा रिमेक आहे.
स्टार प्रवाह वाहिनी ही टीआरपीच्या क्षेत्रात आघाडीवर आहे. या वाहिनीवरील मालिकांना प्रेक्षकांकडून खूप चांगली पसंती मिळते. स्टार प्रवाहचा रिमेक पॅटर्न हा तर सर्वांना माहिती आहे. या मालिकेवरील बऱ्याच मालिका या रिमेक असतात. अशामध्ये आता लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणारी 'घरोघरी मातीच्या चुली' ही मालिका देखील हिंदी मालिकेचा रिमेक असणार आहे. 'घरोघरी मातीच्या चुली' ही मालिका स्टार प्लसवरील २० वर्षांपूर्वीची 'कहाणी घर घर की' या हिंदी मालिकेचा रिमेक असणार आहे.
'कहाणी घर घर की' या हिंदी मालिकेमध्ये प्रसिद्ध अभिनेत्री साक्षी तनवर ही मुख्य भूमिकेमध्ये होती. साक्षीने या मालिकेमध्ये पार्वती अग्रवालची भूमिका साकारली होती. तिच्या या मालिकेला प्रेक्षकांकडून खूप चांगली पसंती देखील मिळाली होती. त्याकाळी ही मालिका प्रेक्षकांची सर्वात जास्त आवडती मालिका होती. या मालकेची निर्मिती एकता कपूर हिच्या बालाजी टेलिफिल्म्सद्वारे करण्यात आली होती.
दरम्यान, 'घरोघरी मातीच्या चुली' ही मालिका स्टार प्रवाहवरील 'ठरलं तर मग' या मालिकेच्या निर्मात्या सुचित्रा बांदेकर यांच्या सोहम प्रोडक्शनचाच एक भाग असणार आहे. राहुल लिंगायत मालिकेचं दिग्दर्शन करणार आहेत. या मालिकेमध्ये रेश्मा शिंदेसोबत सविता प्रभुणे, प्रमोद पवार, उदय नेने, भक्ती देसाई, सुनील गोडसे, बालकलाकार आरोही सांबरे असे दिग्गज कलाकार या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.