हायकोर्टाने नेटफ्लिक्सला दिला दणका, 'The Indrani Mukerjea Story'चं प्रदर्शन थांबवलं

Sheena Bora Murder Case: हायकोर्टाने नेटफ्लिक्सला आदेश दिले की, सीबीआयचे अधिकारी आणि वकिलांसाठी या वेबसीरिजचे स्पेशल स्क्रिनिंग करा. न्यायमूर्ती रेवती मोहिते-डेरे आणि न्यायमूर्ती मंजूष देशपांडे यांच्या खंडपीठापुढे ही सुनावणी झाली.
The Indrani Mukerjea Story
The Indrani Mukerjea StorySaam TV
Published On

Netflix Documentary:

बहुचर्चित शीना बोरा हत्याकांड प्रकरणावरील (Sheena Bora Murder Case) वेबसीरिज 'द इंद्राणी मुखर्जी स्टोरी' (The Indrani Mukerjea Story) आज प्रदर्शित होणार होती. पण ही वेबसीरिज प्रदर्शित होण्यापूर्वीच मुंबई हायकोर्टाने तिचे प्रदर्शन थांबवले आहे. या वेबसीरिजचे प्रदर्शन थांबवत मुंबई हायकोर्टाने (Mumbai High Court) नेटफ्लिक्सला दणका दिला आहे. या वेबसीरिजचे प्रदर्शन थांबवण्यासाठी सीबीआयने मुंबई हायकोर्टात धाव घेतली होती. या प्रकरणावर कोणत्याही प्रकारची वेबसीरिज यावी असे सीबीआयला वाटत नाही. अशामध्ये आता हायकोर्टानेच नेटफ्लिकसला आज प्रदर्शित होणारी ही वेबसीरिजचे प्रदर्शन थांबवण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे नेटफ्लिक्सला दणका बसला आहे.

मुंबई हायकोर्टाने नेटफ्लिक्सला आदेश दिले की, सीबीआयचे अधिकारी आणि वकिलांसाठी या वेबसीरिजचे स्पेशल स्क्रिनिंग करा. न्यायमूर्ती रेवती मोहिते-डेरे आणि न्यायमूर्ती मंजूष देशपांडे यांच्या खंडपीठापुढे ही सुनावणी झाली. या वेबीसीरिजमुळे या प्रकरणाच्या खटल्यावर परिणाम होऊ शकतो असे सीबीआयकडून सांगण्यात आले आहे. या वेबसीरिजचे स्पेशल स्क्रिनिंग झाल्यानंतर २९ फेब्रुवारीला म्हणजे पुढच्या आठवड्यामध्ये याप्रकरणावर सुनावणी होणार आहे.

The Indrani Mukerjea Story
Vikrant Massey: धार्मिक भावना दुखवण्याचा कोणताही हेतू नव्हता, विक्रांत मेस्सीने ६ वर्षांनंतर मागितली माफी

या वेबसीरिजप्रकरणी सीबीआयने केलेल्या याचिकेवर मुंबई हायकोर्टात झालेल्या सुनावणीदरम्यान सीबीआयने सांगितले की, वेब सीरिज प्रदर्शित झाल्यास केस कमकुवत होऊ शकते आणि साक्षीदार प्रभावित होऊ शकतात. इंद्राणी मुखर्जी शीना बोरा हत्या प्रकरणातील आरोपी आहे. शीना ही हत्या झालेल्या इंद्राणी मुखर्जीची मुलगी होती. इंद्राणी मुखर्जीला २०१५ मध्ये या प्रकरणी अटक करण्यात आली होती. या प्रकरणाचा तपास सीबीआय करत आहे.

The Indrani Mukerjea Story
Ekda Yeun Tar Bagha Movie: पोट धरून हसायला तयार राहा, ‘एकदा येऊन तर बघा’चा हिंदी रिमेक येतोय भेटीला

शीना बोरा हत्याकांड प्रकरणामध्ये २३७ साक्षीदार आहेत आणि आतापर्यंत ७८ साक्षीदारांची साक्ष नोंदवण्यात आली आहे. ही वेबसीरिज प्रदर्शित झाली तर त्याचा उर्वरित साक्षीदारांवर परिणाम होऊ शकतो, असा युक्तिवाद सीबीआयकडून करण्यात आला आहे. त्याचवेळी नेटफ्लिक्सच्या वकिलाने सांगितले की, ही वेबसीरिज नसून डॉक्युमेंटरी आहे. सामग्री केवळ साक्षीच्या आधारावर दर्शविली गेली आहे. हा

युक्तिवाद ऐकल्यानंतर हायकोर्टाने या खटल्याशी संबंधित सर्व साक्षीदारांची यादी मागवली आहे. कोणकोणत्या प्रकारचा साक्षीदार आहे हे हायकोर्टाला जाणून घ्यायचे आहे. आता २९ फेब्रुवारीला हायकोर्ट नेमकं काय निर्णय देईल हे पाहणं महत्वाचं ठरेल.

The Indrani Mukerjea Story
Shiv Thakare: 'बिग बॉस' फेम शिव ठाकरे आणि अब्दु रोजिक अडचणीत, ईडीने पाठवला समन्स; नेमकं काय आहे प्रकरण?

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com