Shaitaan Trailer: अजय देवगणच्या 'शैतान'चा खरतनाक ट्रेलर रिलीज, पाहून अंगावर येईल काटा

Shaitaan Movie Trailer Out: या चित्रपटाचे नवनवीन पोस्टर, टीझर प्रेक्षकांची उत्सुता वाढवली होती. प्रेक्षक या चित्रपटाच्या ट्रेलरची आतुरतेने वाट पाहत होते. अखेर त्यांची प्रतीक्षा आज संपली.
 Shaitaan Movie
Shaitaan MovieSaam Tv
Published On

Ajay Devgn Shaitaan Movie:

बॉलिवूड (Bollywood) अभिनेता अजय देवगण (Ajay Devgan) आणि आर माधवन (R Madhavan) सध्या त्याच्या आगामी चित्रपट 'शैतान'मुळे (Shaitaan Movie) चर्चेत आहेत. सुपरनॅच्युरल थ्रिलर चित्रपटामध्ये अजय देवगण मुख्य भूमिकेमध्ये तर आर माधवन शैतानाच्या भूमिकेमध्ये दिसणार आहे. त्यांच्या या चित्रपटाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत.

या चित्रपटाचे नवनवीन पोस्टर, टीझर प्रेक्षकांची उत्सुता वाढवली होती. प्रेक्षक या चित्रपटाच्या ट्रेलरची आतुरतेने वाट पाहत होते. अखेर त्यांची प्रतीक्षा आज संपली. या चित्रपटाचा खतरनाक ट्रेलर आज रिलीज करण्यात आला. हा ट्रेलर पाहून प्रेक्षकही घाबरले.

शैतान चित्रपटामध्ये अजय देवगण आणि आर माधवन आमने-सामने येणार आहेत. दृश्यम चित्रपटानंतर अजय देवगण पुन्हा एकदा आपल्या कुटुंबाच्या बचावासाठी लढताना दिसणार आहे. पण यावेळी अजय देवगण शत्रूंशी नाही तर शैतानांविरोधात लढताना दिसणार आहे. विकास बहलच्या दिग्दर्शनाखाली तयार होत असलेल्या या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच रिलीज झाला. हा ट्रेलर खूपच खतरनाक आहे. जो पाहून प्रेक्षकांच्या अंगावर काटा आला आहे.

'शैतान'चा २ मिनिट २६ सेकंदाचा ट्रेलर पाहून तुम्ही देखील घाबराल. चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये असे दिसते की, आर माधवन अजय देवगणच्या घरी पाहुणे म्हणून येतो आणि त्याच्या मुलीला काळ्या शक्तींनी आपल्या ताब्यात घेतो. पण नंतर अजयला त्याच्या आसुरी शक्तींची माहिती होते. आर माधवनचा शैतान अवतार अतिशय भितीदायक आहे. ट्रेलरमध्ये आर माधवन त्याच्या पात्राला पूर्ण न्याय देताना दिसत आहे. अजय देवगण आणि ज्योतिका देखील जबरदस्त कामगिरी करताना दिसले आहेत. या चित्रपटात ज्योतिकाने अजयच्या पत्नीची भूमिका साकारली आहे.

 Shaitaan Movie
Rakul Preet-Jacky Bhagnani Wedding: जॅकी भगनानीची झाली रकुल प्रीत, धुमधडाक्यात पार पडलं लग्न

शैतान चित्रपट थ्रिलर, सस्पेंस आणि काळीजादूवर आधारित आहे. या चित्रपटामध्ये अजय देवगणसोबत साऊथची अभिनेत्री ज्योतिका (Jyothika) मुख्य भूमिकेमध्ये आहे. हा चित्रपट येत्या ८ मार्च रोजी प्रदर्शित होणार आहे. विकास बहलने 'शैतान' चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. जादूटोणा, सस्पेन्स आणि गडद जगावर आधारित हा चित्रपट ८ मार्च २०२४ रोजी प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत.

 Shaitaan Movie
हायकोर्टाने नेटफ्लिक्सला दिला दणका, 'The Indrani Mukerjea Story'चं प्रदर्शन थांबवलं

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com