Garbage Heap Outside Filmcity : मुंबईच्या रस्त्यावर कचऱ्याचे मोठमोठे ढीग; संतापलेला शशांक केतकर म्हणतोय, "याला जबाबदार..."
Shashank Ketkar Angry Post Saam Tv
मनोरंजन बातम्या

Shashank Ketkar Angry Post : मुंबईच्या रस्त्यावर कचऱ्याचे मोठमोठे ढीग; संतापलेला शशांक केतकर म्हणतोय, "याला जबाबदार..."

Chetan Bodke

मराठमोळा अभिनेता शशांक केतकर ह्याने 'होणार सुन मी ह्या घरची' मालिकेतून विशेष प्रसिद्धी मिळवली आहे. त्याने नाटक, मालिका आणि चित्रपटाच्या माध्यमातून चाहत्यांचे मनोरंजन केले आहे. कायमच आपल्या अभिनयामुळे चर्चेत राहणाऱ्या शशांकने सध्या इन्स्टाग्रामवर सामाजिक परिस्थितीवर भाष्य केले आहे. शशांकने गेल्या काही दिवसांपूर्वीही मुंबईच्या रस्त्यावरची अस्वच्छता दाखवणारा एक व्हिडीओ शेअर केला होता. अशातच आता पुन्हा एकदा अभिनेत्याने एक व्हिडीओ शेअर केला आहे.

मुंबईच्या नजीक असलेल्या गोरेगावमध्ये फिल्मसिटी आहे. या परिसरातील एक व्हिडीओ शशांकने इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. तेथील रस्त्याच्या बाजुला ठेवण्यात येणाऱ्या कचरापेटीचा व्हिडीओ शेअर केला आहे. व्हिडीओमध्ये रस्त्यावरील कचरा पेटीच्या आजूबाजूला कसा कचरा पसरला आहे आणि कशा प्रकारे सर्वत्र घाणीचं साम्राज्य पसरलं आहे, हे दिसतंय. शशांक केतकरने इन्स्टाग्रामवर व्हिडीओ शेअर करत संताप व्यक्त केला आहे.

शशांक केतकरने व्हिडीओ शेअर करताना कॅप्शन दिले की, "मेरा भारत महान. मोदीजी असोत, राहूलजी असोत किंवा माझ्यासारखी सामान्य जनता असो, हे चित्र भारतात कुठेच अपेक्षित नाहीये !!! मुंबईची फिल्मसिटी बघायला भारतातूनच नाहीतर जगभरातून लोक येतात. तेव्हा त्यांच्या स्वागतासाठी हा इतका सुंदर परिसर असावा ही कल्पना कोणाची ? ही अवस्था, हे चित्र काही आजचं नाहीये. मी गेल्या १० वर्षात ती जागा कधीच स्वच्छ पाहिली नाहीये. इतकी उदासीनता का? हा सगळा कचरा उचलून महानगरपालिकेच्या ऑफिसच्यासमोर ओतला तर आवडेल ? येणारे पर्यटक, कलाकार, तिथे राहणारे नागरिक आणि सगळ्यांच्या माथी हा असला घाणेरडा परिसर का मारला आहे?"

सध्या शशांक केतकरच्या ह्या इन्स्टा व्हिडीओची तुफान चर्चा होत असून त्याला नेटकऱ्यांकडून पाठिंबा मिळत आहे. "दयनीय अवस्था आहे खरंच. सगळ्यात आधी कचऱ्याचं व्यवस्थापन करायला हवंय. आपला कचरा आपलीच जबाबदारी आहे तो असा इकडे तिकडे न टाकता नीटपणे रोज दाराशी येणाऱ्या घंटागाडीत जरी टाकला तरी बराच हातभार लागेल पण घाण करणं ही घाणेरडी सवय आहे लोकांना.वाईट वाटतं जेव्हा हा कचरा गायीच्या किंवा अनेक प्राण्यांच्या पोटात जाताना दिसतो"

"सगळ्यात आधी जे गुठखे खाऊन इथे तिथे जे थुकतात नि त्यांना मुंबई च्या बाहेर काढा", "खुप वाईट वाटलं होतं हे बघून, अगदी हौसेने फिल्म सिटी बघायला गेलो होतो, पण हे असं स्वागत होतं आत मधले पण काही काही काही रस्त्यांची हालत एवढी वाईट आहे की विचार येतो मनात की सगळ्यांनी वर्गणी काढून केले तरी होऊ शकतील हे रस्ते" अशा प्रतिक्रिया चाहत्यांनी दिलेल्या आहेत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ashadhi Wari 2024: पवार कुटुंबीय राजकारणात विभक्त वारीत एकत्र!

Marathi Live News Updates : महायुतीत समन्वय राखण्यात अपयश, अजित पवारांची जाहीर कबुली

Maratha Reservation: मोठी घोषणा! लवकरच सगेसोयऱ्यांचा अध्यादेश काढणार!

Sage Soyare Ordinance: मोठी बातमी! राज्य सरकार लवकरच सगेसोयऱ्याचा अध्यादेश काढणार, चंद्रकात पाटील यांची माहिती

Mahadev Jankar Video: महादेव जानकरांची मोठी घोषणा; पुढची लोकसभा बारामतीतून लढणार!

SCROLL FOR NEXT