आदिवासी विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ; निवासी आश्रमशाळेत घाणीचं साम्राज्य, अन्नही निकृष्ठ...

त्र्यंबकेश्वर तालुक्यातील पिंपरीच्या अनुदानित निवासी आदिवासी आश्रमशाळेतील धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.
आदिवासी विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ; निवासी आश्रमशाळेत घाणीचं साम्राज्य, अन्नही निकृष्ठ...
आदिवासी विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ; निवासी आश्रमशाळेत घाणीचं साम्राज्य, अन्नही निकृष्ठ...अभिजीत सोनावणे

नाशिक: त्र्यंबकेश्वर तालुक्यातील पिंपरीच्या अनुदानित निवासी आदिवासी आश्रमशाळेतील धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या निवासी आश्रमशाळेत शिकत असलेल्या शेकडो आदिवासी (Adivasi) विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ सुरु आहे. त्याचं कारण म्हणजे हे विद्यार्थी ज्या अवस्थेत राहतायत ते पाहून या विद्यार्थ्यांचं आरोग्य किती धोक्यात आहे हे लक्षात येतं. (Playing with the lives of tribal students; dirty in residential ashram school, even food is inferior)

हे देखील पहा -

या आदिवासी निवासी (Adivasi Ashram School) आश्रमातील विद्यार्थ्यांना पोषक आणि स्वच्छ आहार देणं बंधनकारक असतानादेखील या विद्यार्थ्यांना निकृष्ट दर्जाचं जेवण दिलं जात आहे. तसेच संपुर्ण आश्रमशाळेत घाणीचं साम्राज्य असल्याने विद्यार्थ्यांचं आरोग्य धोक्यात आलं आहे. येथील स्नानगृहे आणि शौचालयाची अवस्था पाहून अक्षरशः किळस येते अशी दुरावस्था आणि अस्वच्छता याठिकाणी झालेली आहे. अशा घाणीच्या साम्राज्यात विद्यार्थ्यांच्या शारीरिक आरोग्यावर तर परिणाम होतोच आहे, शिवाय अशा वातावरणाचा त्यांच्या मनावर आणि परिणामी त्यांच्या अभ्यासावरदेखील नकारात्मक परिणाम होऊ शकतो.

आदिवासी विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ; निवासी आश्रमशाळेत घाणीचं साम्राज्य, अन्नही निकृष्ठ...
कोरोनाचा विस्फोट! पटियाला मेडिकल कॉलेजमध्ये 100 विद्यार्थी कोविड पॉझिटिव्ह

एकीकडे कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असतांना एकाच खोलीत विद्यार्थ्यांना रहावं लागत असून तिथेच अभ्यास करावा लागतोय. लाखो रुपयांचं अनुदान लाटूनदेखील आश्रमशाळा चालकांचं विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेकडे अक्षम्य दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे आदिवासी आश्रमशाळेत विद्यार्थ्यांचा कोंडमारा होतोय. आता विद्यार्थ्यांच्या या परिस्थितीला जबाबदार कोण? आणि विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळणाऱ्या आश्रमशाळा चालकांवर कारवाई होणार का? असा प्रश्न विचारला जातोय.

Edited By - Akshay Baisane

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com