कोरोनाचा विस्फोट! पटियाला मेडिकल कॉलेजमध्ये 100 विद्यार्थी कोविड पॉझिटिव्ह

देशभरात कोरोनाचे रुग्ण झपाट्याने वाढत आहेत. पण सर्वात चिंतेची बाब म्हणजे यावेळी मोठ्या संख्येने डॉक्टरही कोरोना पॉझिटिव्ह येत आहेत.
कोरोनाचा विस्फोट! पटियाला मेडिकल कॉलेजमध्ये 100 विद्यार्थी कोविड पॉझिटिव्ह
कोरोनाचा विस्फोट! पटियाला मेडिकल कॉलेजमध्ये 100 विद्यार्थी कोविड पॉझिटिव्हSaam Tv

पटियाला : देशभरात कोरोनाचे (Corona) रुग्ण झपाट्याने वाढत आहेत. पण सर्वात चिंतेची बाब म्हणजे यावेळी मोठ्या संख्येने डॉक्टरही कोरोना पॉझिटिव्ह येत आहेत. पटणाच्या NMCH मध्ये डॉक्टरांना लागण झाल्याची प्रकरणे सातत्याने समोर येत आहेत. आतापर्यंत येथे 168 प्रकरणे नोंदवली गेली आहेत. त्याच वेळी, पटियालामध्ये 100 वैद्यकीय विद्यार्थ्यांना संसर्ग झाल्याचे आढळून आले आहे. तर उत्तर प्रदेशची राजधानी लखनऊ येथील मेदांता रुग्णालयात २५ वैद्यकीय कर्मचाऱ्यांना संसर्ग झाला आहे.

पटियालामध्ये 100 वैद्यकीय विद्यार्थ्यांना संसर्ग;

पटियाला मेडिकल कॉलेजमध्ये 100 विद्यार्थ्यांना कोरोनाची लागण झाली आहे. यानंतर वसतिगृहात राहणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना लवकरात लवकर वसतिगृह सोडण्यास सांगण्यात आले आहे. या बातमीला पंजाब सरकारमधील कॅबिनेट मंत्री राज कुमार वेरका यांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे.

मेदांता लखनऊमध्ये 25 सदस्यांना संसर्ग झाला आहे

एकीकडे उत्तर प्रदेशात कोरोनाची प्रकरणे झपाट्याने वाढत आहेत. दुसरीकडे, रुग्णालयांमध्येही कोविड संसर्ग पसरत आहे. लखनौच्या मेदांता हॉस्पिटलमध्ये नुकत्याच झालेल्या चाचण्यांमध्ये वैद्यकीय कर्मचार्‍यातील 25 लोकांना संसर्ग झाल्याचे आढळून आले आहे. या २५ जणांमध्ये एक डॉक्टर, पॅरा मेडिकल स्टाफचाही समावेश आहे. तर, शनिवारी सरकारने मेदांताच्या सर्व कर्मचाऱ्यांच्या कोरोना तपासणीचे आदेश दिले होते.

या, दरम्यान मोठ्या संख्येने कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. मेदांता हे लखनौचे सर्वात मोठे आणि VVIP रुग्णालय आहे. येथे दररोज हजारो रुग्ण उपचारासाठी येत असतात. मेदांता हॉस्पिटलचे राकेश कपूर यांनी सांगितले की, एकूण 800 रुग्णांची कोरोना चाचणी करण्यात आली. त्यापैकी 25 जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. या सर्वांना घरीच होम क्वारंटाईनमध्ये राहण्यास सांगण्यात आले आहे.

पाटण्यात कोरोनाचा स्फोट;
बिहारच्या पाटणा येथील एनएमसीएचमध्ये डॉक्टर सतत कोरोना पॉझिटिव्ह येत आहेत. सोमवारी 133 डॉक्टर आणि वैद्यकीय विद्यार्थ्यांचे नमुने घेण्यात आले, ज्यामध्ये 72 लोक पॉझिटिव्ह आढळले आहेत. याआधी रविवारी ९६ डॉक्टर आणि वैद्यकीय विद्यार्थ्यांना संसर्ग झाल्याचे आढळून आले होते.

आता NMCH, पटना येथे 168 डॉक्टर आणि वैद्यकीय विद्यार्थी पॉझिटिव्ह आले आहेत. एनएमसीएचमध्ये ज्या प्रकारे कोरोना संसर्गाच्या रुग्णांची भेट घेतली जात आहे, त्यावरून आरोग्य विभागात खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, 168 बाधितांपैकी वैद्यकीय विद्यार्थ्यांची संख्या डॉक्टरांपेक्षा जास्त आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com