Border 2 Announcement : सनी देओलच्या २७ वर्षे जुन्या चित्रपटाचा सिक्वेल येणार, ‘बॉर्डर २’ची घोषणा

Border 2 Promo : सनी देओलच्या ‘गदर २’ चित्रपटाने गेल्या वर्षी बॉक्स ऑफिसमध्ये जोरदार धुमाकूळ घातला. अशातच आता सनी देओलने त्याच्या आणखी एका चित्रपटची घोषणा केली आहे.
Border 2 Announcement
Border 2 AnnouncementSaam Tv

सनी देओलच्या ‘गदर २’ चित्रपटाने गेल्या वर्षी बॉक्स ऑफिसमध्ये जोरदार धुमाकूळ घातला होता. २०२३ मध्ये ब्लॉकबस्टर ठरलेल्या चित्रपटांपैकी हा एक चित्रपट होता. अशातच आता सनी देओलने त्याच्या आणखी एका चित्रपटची घोषणा केली आहे. मोशन पोस्टर शेअर करत अभिनेत्याने त्याच्या आगामी चित्रपटाची घोषणा केलेली आहे. ‘गदर २’ नंतर आता ‘बॉर्डर २’ प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Border 2 Announcement
Chandu Champion Movie : पॅरालिम्पिक सुवर्णपदक विजेते मुरलीकांत पेटकर यांनी 'चंदू चॅम्पियन' पाहिला, स्वत: चा प्रवास पाहून डोळे पाणावले

तब्बल २७ वर्षांच्या मोठ्या गॅपनंतर ‘बॉर्डर’ चा सिक्वेल प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. १९९७ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘बॉर्डर’ या मल्टीस्टारर चित्रपटाच्या सिक्वेलची गेल्या अनेक दिवसांपासून चाहत्यांच्या मनात उत्सुकता होती. नुकताच चित्रपटाचा प्रोमो रिलीज झालेला आहे. या प्रोमोमध्ये, २७ वर्षांपूर्वी एका फौजीने शब्द दिला होता की, तो पुन्हा येईल. दिलेला शब्द पूर्ण करत आता तो फौजी परत येतोय. "संदेसे आते है, हमे तडपाते है" हे गाणं त्या प्रोमोमध्ये नव्या रुपात ऐकायला मिळत आहे.

‘बॉर्डर २’ची निर्मिती भूषण कुमार, कृष्ण कुमार, जेपी दत्ता आणि निधी दत्ता करणार आहेत. तर अनुराग सिंह ‘बॉर्डर २’चे दिग्दर्शन करणार आहेत. ‘बॉर्डर २’साठी अनु मलिक, मिथुन संगीत देणार आहेत जावेद अख्तर या चित्रपटासाठी गाणी लिहिणार आहेत. तर सोनू निगम गाणे गाणार आहेत. सध्या या चित्रपटाची स्टारकास्ट समोर आलेली नाही. ‘बॉर्डर’ प्रमाणेच ‘बॉर्डर २’ही ब्लॉकबस्टर व्हावा, या दृष्टीकोणातून चित्रपटाची स्क्रिप्ट लिहिली जात आहे. ‘बॉर्डर २’ ची कथा ‘बॉर्डर’ पेक्षा पूर्णपणे वेगळी असणार आहे. ‘बॉर्डर २’ हा आजवरचा सर्वात मोठा युद्धपट ठरणार असल्याचंही म्हटलं जात आहे.

Border 2 Announcement
Disha Patani Net Worth : ५०० रुपये घेऊन मुंबई गाठली, आज दिशा पटानी कोट्यवधींची मालकीण; एका चित्रपटाचं मानधन किती?

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com