भारताचे पहिले पॅरालिम्पिक सुवर्णपदक विजेते मुरलीकांत पेटकर (Murlikant Petkar) यांच्या जीवनावर आधारित 'चंदू चॅम्पियन' (Chandu Champion) चित्रपटाची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत होते. कार्तिक आर्यन मुख्य भूमिकेत असलेला हा चित्रपट येत्या १४ जूनला थिएटरमध्ये रिलीज होणार आहे. अशातच नुकताच या चित्रपटाचा प्रीमियर पार पडला. यावेळी सुवर्णपदक विजेते मुरलीकांत पेटकर यांनी त्यांच्या कुटुंबीयांसोबत चित्रपट पाहिला. चित्रपट पाहताना त्यांना त्यांचे अश्रु अनावर झाले.
'चंदू चॅम्पियन' चित्रपटामध्ये पॅरालिम्पिक सुवर्णपदक विजेते मुरलीकांत पेटकर यांना स्वत:चा स्ट्रगल रुपेरी पडद्यावर पाहून अश्रू अनावर झाले. सध्या सोशल मीडियावर प्रीमियर दरम्यानचे अनेक व्हिडीओ आणि फोटो व्हायरल होत आहेत. आपलं लाईफ रुपेरी पडद्यावर पाहताना ते भावुक झाले होते. शेवटचा स्विमिंग कॉम्पिटिशनचे सीन पाहताना मुरलीधर आणि त्यांचा मुलगा अर्जुन यांना अश्रू अनावर झाले. त्यांच्या डोळ्यातील अश्रू पाहून कार्तिकच्या ही डोळ्यात पाणी आलं.
सध्या हा भावुक व्हिडीओ इन्स्टाग्रामवर तुफान व्हायरल होत आहे. कार्तिक आणि मुरलीधर यांच्यातील बाँडचे सध्या नेटकरी जोरदार कौतुक करीत आहे. सध्या चाहत्यांकडूनही या चित्रपटाचे जोरदार कौतुक केले जात आहे. सध्या चित्रपटाच्या डायलॉग्जची सोशल मीडियावर चांगलीच चर्चा होताना दिसत आहे. चित्रपटाचे दिग्दर्शन कबीर खान यांनी केले असून चित्रपटाची निर्मिती साजिद नाडियादवाला आणि कबीर खान यांनी केली आहे.
'चंदू चॅम्पियन' हा पॅरालिम्पिक विजेते मुरलीकांत पेटकर यांचा जीवनपट आहे. सैन्य अधिकारी असलेल्या मुरलीकांत पेटकर यांना १९६५ मध्ये झालेल्या भारत- पाक लढाईत अपंगत्व आले होते. त्यांनी या अपंगत्वावर मात करत पॅरालिम्पिक मध्ये तीन स्पर्धा प्रकारांमध्ये विजेतेपद मिळवलं. त्यांचा हा सगळा प्रवास चित्रपटात पाहायला मिळणार आहे. कार्तिक आर्यन मुख्य भूमिकेत असून त्याने चित्रपटासाठी विशेष मेहनत घेतली.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.