Disha Patani Net Worth : ५०० रुपये घेऊन मुंबई गाठली, आज दिशा पटानी कोट्यवधींची मालकीण; एका चित्रपटाचं मानधन किती?

Disha Patani Birthday : मुळची उत्तर प्रदेशची असलेल्या दिशाने खिशात ५०० रुपये घेऊन मुंबई गाठली होती.. पण असं असलं तरीही दिशा आज कोट्यवधींची मालकीण आहे. वाढदिवसानिमित्त तिच्या नेटवर्थबद्दल जाणून घेऊया...
Disha Patani Birthday : ५०० रुपये घेऊन मुंबई गाठली, आज दिशा पटानी कोट्यवधींची मालकीण; एका चित्रपटाचं मानधन किती?
Disha Patani Net WorthSaam Tv

आपल्या सौंदर्याच्या आणि अभिनयाच्या जोरावर अभिनेत्री दिशा पाटनी हिने आपली विशेष ओळख तयार केली आहे. तिच्या अभिनयाची कायमच चाहत्यांमध्ये जोरदार चर्चा होते. आज दिशा पटानी हिचा ३२ वा वाढदिवस आहे. मुळची उत्तर प्रदेशची असलेल्या दिशाने खिशात ५०० रुपये घेऊन मुंबई गाठली होती.. पण असं असलं तरीही दिशा आज कोट्यवधींची मालकीण आहे. वाढदिवसानिमित्त तिच्या नेटवर्थबद्दल जाणून घेऊया...

Disha Patani Birthday : ५०० रुपये घेऊन मुंबई गाठली, आज दिशा पटानी कोट्यवधींची मालकीण; एका चित्रपटाचं मानधन किती?
Disha Patani Birthday : दिशा पाटनीला अभिनय नव्हे तर 'या' क्षेत्रात करायचं होतं करिअर; खिशात ५०० रुपये घेऊन गाठली होती मुंबई, जाणून घ्या अभिनेत्रीची स्ट्रगल स्टोरी

दिशा पटानीने सुशांत सिंग राजपूतसोबत 'एमएस धोनी: द अनटोल्ड स्टोरी'मधून तिच्या करिअरची सुरुवात केली. या चित्रपटात दिशाचे खूप कमी सीन्स होते, पण तिचा अभिनय प्रेक्षकांना खूप आवडला आणि तिचा हा चित्रपट सुपरहिट ठरला. दिशा पटानीच्या संपत्तीविषयी सांगायचे तर, ती ७५ कोटींची मालकीण आहे. दिशा अभिनयासोबतच मॉडेलिंग आणि ब्रँड एंडोर्समेंटमधून प्रचंड कमाई करते.

२०१५ मध्ये, दिशा कॅडबरीच्या जाहिरातीमुळे प्रसिद्धी झोतात आली होती. तेव्हापासून दिशा अनेक ब्रँड्सच्या जाहिरातींमध्ये दिसली आहे. दिशा पटानीने २०१६ मध्ये मुंबईमध्ये आलिशान अपार्टमेंट खरेदी केले होते. तिच्या ह्या नव्या घराची किंमत सुमारे ५ कोटी रुपये आहे. अभिनेत्री दिशा पटानीकडे आलिशान कार्सचे मोठे कलेक्शन आहे. मिनी कूपर, मर्सिडीज बेंझ आणि ऑडीसह अशा अनेक ब्रँड्सच्या कार तिच्याकडे आहे.

Disha Patani Birthday : ५०० रुपये घेऊन मुंबई गाठली, आज दिशा पटानी कोट्यवधींची मालकीण; एका चित्रपटाचं मानधन किती?
Singer Palak Muchhal: प्रसिद्ध गायिका पलक मुच्छलने ३००० मुलांचे वाचवले प्राण, होतोय कौतुकाचा वर्षाव

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com