Eknath Shinde: मुंबई-ठाण्यादरम्यान बनणार फिल्मसिटी, महाराष्ट्र सरकारची अशी आहे योजना

राज्य सरकार मराठी रंगभूमी आणि चित्रपटांना मदत करेल, असे एकनाथ शिंदे म्हणाले.
CM Eknath Shinde
CM Eknath ShindeSaam Tv

CM Eknath Shinde News: महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रविवारी मुंबई आणि ठाणे दरम्यान फिल्मसिटी उभारण्याची घोषणा केली आहे. मुख्यमंत्र्यांनी सांगितले की, "कलाकारांना व्यापक व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी महाराष्ट्र सरकार मुंबई ते ठाणे दरम्यान फिल्मसिटी बांधण्याची योजना आखणार आहे."

CM Eknath Shinde
Kangana Ranaut On Twitter: अकाउंट सस्पेंड असतानाही ट्विटरच्या समर्थनात कंगनानेकेली पोस्ट

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एका कार्यक्रमात असे वक्तव्य केले आहे. प्रसिद्ध अभिनेते प्रशांत दामले त्यांच्या नाटकाचे 12,500 व्या प्रयोगानिमित्त एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्या कार्यक्रमादरम्यान राज्य सरकार मराठी रंगभूमी आणि चित्रपटांना मदत करेल, असे एकनाथ शिंदे म्हणाले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, "ठाण्यातही मोठ्या प्रमाणावर शूटिंग सुरू आहे. त्यामुळे मुंबई ते ठाणे दरम्यान 23 किमी अंतरावर फिल्मसिटी उभारण्याची आम्ही योजना आखणार आहोत." (Eknath Shinde)

नाटक सभागृहांच्या दुरवस्थेची पाहणी करून त्यात सुधारणा करण्यासाठी आवश्यक पावले उचलण्यासाठी नोडल ऑफिसरची नियुक्ती केली जाईल, असेही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले आहेत. एवढेच नाही तर प्रशांत दामले यांना पद्म भूषण पुरस्कार देण्यासाठी राज्य सरकारने केंद्राकडे शिफारस पाठवली असल्याची माहितीही एकनाथ शिंदे यांनी दिली आहे. (Drama)

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com