Aai Tuljabhavani SAAM TV
मनोरंजन बातम्या

Aai Tuljabhavani : 'आई तुळजाभवानी' मालिकेत सुरू होणार महिषासुर वधाचे पर्व, अभिनेता कुमार हेगडेनं सांगितल्या पडद्यामागच्या गोष्टी

Kumar Hegde : अभिनेता कुमार हेगडेने 'आई तुळजाभवानी' मालिकेत महिषासुराची भूमिका साकारली आहे. त्याने भूमिका करताना आलेले अनुभव सांगितले आहेत.

Shreya Maskar

'आई तुळजाभवानी' (Aai Tuljabhavani) प्रेक्षकांकडून उत्तम प्रतिसाद मिळत आहे. आता या आठवड्यात मालिकेचा अत्यंत महत्त्वाच्या टप्पा उलगडणार असून महिषासुराचे तप पूर्णत्वाला गेले आहे. ब्रम्हदेवाकडून मिळालेल्या वरदानाने बलशाली झालेल्या महिषासुराच्या नव्या रुपाचा त्याच्या त्रैलोक्याच्या सम्राट होण्याच्या प्रवासाचा अत्यंत नाट्यमय टप्पा मालिकेत उलगडणार आहे. आई तुळजाभवानीच्या अवतार कार्याच्या प्रयोजनाचे महत्त्वाचे कारण ठरलेला महिषासुराचा उन्माद आणि देवीसमोर उभे राहिलेले आव्हान हा प्रत्येक देवी भक्तांसाठी उत्सुकतेचा विषय आहे.

महिषासुराचा कथाभाग आता मालिकेत प्रेक्षकांना बघायला मिळणार असून तो अत्यंत रंजक प्रकारे प्रेक्षकांसमोर येणार आहे. महिषासुर त्याला मिळालेल्या वरदानाचा कसा दुरुपयोग करतो. आई तुळजाभवानी आता महिषासुराचा वध कसा करणार? हे मालिकेत उलगडणार आहे. 'आई तुळजाभवानी' मालिका कलर्स मराठीवर रात्री ९.०० वाजता पाहायला मिळते.

कुमार हेगडे (Kumar Hegde ) हे लोकप्रिय अभिनेते महिषासुराची भूमिका साकारत असून त्यांनी आपल्या भूमिकेबद्दल सांगितले की, "महिषासुर साकारणे अत्यंत आव्हानात्मक असून या भूमिकेला असलेले वेगवेगळे पदर ही भूमिका इतर असुर भूमिकांपेक्षा वेगळी ठरते. याआधी मी हिंदीयामध्ये अनेक पौराणिक शो केले आहेत. पण मराठीतील ही माझी पहिलीच वेळ आहे. त्यामुळे अर्थातच दडपण आले होते. महिषासुर साकारताना खूप गोष्टींची दखल घेण्यात आली. अगदी त्याच्या वेशभूषेपासून, त्याच्या देहबोलीवर. मी स्वतः अनेकी गोष्टी वाचल्या अजूनही अभ्यास सुरूच आहे. "

कुमार पुढे म्हणाला की, "लढाइचे दृश्य जेव्हा मालिकेत दाखवण्यात येतात त्यासाठी देखील विशेष तयारी करण्यात आली आहे. महिषासुराची आभूषणे, त्याचा पेहराव हे सगळं धरून जवळपास तयार होण्यासाठीच १ ते २ तास लागतात. जर लढाईचे प्रसंग असतील तर त्याचा सराव, आणि पूर्वतयारी, शूट हे धरून चार ते साडेचार तास लागतात. ही मालिका माझ्यासाठी खूप जवळची आहे."

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune Rave Party : खडसेंच्या जावयाला रेव्ह पार्टीत अटक, कट्टर विरोधक गिरिश महाजनांची पहिली प्रतिक्रिया, काय म्हणाले...

Maharashtra Live News Update: यवतमाळमध्ये आमदार सोनवणे विरोधात आदिवासी संघटना आक्रमक

महिलांचा रस्त्यावर राडा! शेजारच्या वादातून सुरू झाली हाणामारी;VIDEO

Hyundai Kia SUV: ग्राहकांसाठी खुशखबर! ह्युंदाई आणि किआ लाँच करणार 3 नव्या कॉम्पॅक्ट मॉडेल्स

Pune Rave Party: भाजप म्हणजेच 'रेव्ह पार्टी', रोहिणी खडसेंच्या नवऱ्याला अटकेनंतर संजय राऊत संतापले

SCROLL FOR NEXT