सध्या 'आई तुळजाभवानी' (Aai Tuljabhavani) मालिका खूप गाजत आहे. प्रेक्षकांकडून मालिकेला उत्तम प्रतिसाद मिळत आहे. आता मराठी अभिनेत्री पूजा काळेने आई तुळजाभवानी मालिका मिळाल्यानंतर तिला कसे वाटले. तसेच भूमिका साकारताना तिला काय अनुभव आले यांबद्दल खुलासा केला आहे. ती नेमकं काय बोली जाणून घ्या.
'आई तुळजाभवानी' मालिकेचा अनुभव सांगताना पूजा (Pooja kale ) म्हणाल की, "लहानपणापासून सुरू असलेला नृत्याचा रियाज आणि माझी नृत्याची प्रचंड आवड ह्यामुळे मालिका करताना जेव्हा कुठे नृत्याचा टेक असेल तेव्हा मी खूप खुश असते. अभिनयासाठी हावभाव करताना नृत्याचा फायदाच होता. पौराणिक कथांचे नृत्यामध्ये आम्ही सादरीकरण करतो. अशावेळी अंग ,प्रत्यंग, उपांगाचा वापर होऊन नवरस सादर करतो. ती सवय असल्याने अभिनय करायला सोपे जाते."
पुढे ती म्हणाली, "आई तुळजाभवानी मालिकेची विचारणा जेव्हा झाली, तेव्हा माझ्या मनात चटकन हो उत्तर आले. कारण तुळजाभवानी सोबत माझ्या घराचं जून नाते आहे. आमची ती कुलस्वामिनी आहे. नृत्यात मी अनेकदा तांडव सादर केले आहे. पण, साक्षात तेच साकारायला मिळणं हे मी माझे भाग्य समजते. आई तुळजाभवानी मालिकेसाठी ३५० ते ४०० हून अधिक ऑडिशन घेतल्या गेल्या होत्या ज्यातून माझी निवड झाली. माझ्या नशिबात ही मालिका लिहिली होती असं म्हणायला हरकत नाही. देवीचीच इच्छा असावी म्हणून माझ्यापर्यंत ही मालिका मिळाली. "
मालिकेतील तांडव नृत्याचा अनुभव सांगताना पूजा काळे म्हणाली, "जेव्हा मला कळले मालिकेत असे आहे तेव्हा पहिले तर मी खूप खुश झाली. कारण नृत्य हा माझा खूपच जवळचा विषय आहे आणि आता मला ते मालिकेत सादर करण्याची संधी मिळते आहे त्यामुळे मला खुपच आनंद झाला. शूटिंग आणि प्रत्यक्षात सादर करणे यात निश्चितच खूप फरक आहे. पण मालिकेत तांडव मी ऑन द स्पॉट केले होते. मला आमचे दिग्दर्शक सर बोले की, "तांडव सादर करायचा आहे. कधीपर्यंत प्रॅक्टिस करून आपण शूट करुयात". तेव्हा मी म्हणाले, "ऑन द स्पॉट केले तरी चालेल." मी तांडव सादर करण्याआधी अजिबात रियाझ केला नाही. कदाचित देवीनेच मला तेव्हा बळ दिले."
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.