Giri Dinesh: पूजा करताना अभिनेत्याला हार्टअटॅक; ४५ व्या वर्षी घेतला जगाचा निरोप, चित्रपटसुष्टीत हळहळ

Giri Dinesh Passed Away: कन्नड चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेते गिरी दिनेश यांचे अचानक हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. 'नवग्रह' चित्रपटातील त्यांच्या भूमिकेमुळे त्यांना प्रसिद्धी मिळाली होती.
Giri Dinesh
Giri Dinesh Google
Published On

Giri Dinesh: कन्नड चित्रपटसृष्टीतून एक अतिशय दुःखद बातमी समोर आली आहे. 'नवग्रह' चित्रपटातील भूमिकेमुळे लोकप्रियता मिळवलेले ज्येष्ठ कन्नड अभिनेते गिरी दिनेश यांचे अचानक हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. ही बातमी कळताच चित्रपटसृष्टीत शोककळा पसरली. सोशल मीडियावर चाहते अभिनेत्याबद्दल शोक व्यक्त करत आहेत. गिरी दिनेश यांचे निधन शुक्रवारी, ७ फेब्रुवारी रोजी झाल्याचे सांगितले जाते. ते ४५ वर्षांचे होते. संध्याकाळी पूजा करत असताना त्यांना अचानक हृदयविकाराचा झटका आला.

कन्नड अभिनेता गिरी दिनेश शुक्रवारी संध्याकाळी त्यांच्या घरी पूजा करत होते. त्याच क्षणी त्यांनी छातीत दुखण्याची तक्रार केली आणि ते खाली पडले. त्यांची प्रकृती बिघडली म्हणून त्यांना ताबडतोब जवळच्या रुग्णालयात नेण्यात आले परंतु उपचार सुरू होण्यापूर्वीच गिरी दिनेश यांचे निधन झाले. यानंतर डॉक्टरांनी अभिनेत्याला मृत घोषित केले. त्यांचे अंतिम संस्कार आज शनिवारी केले.

Giri Dinesh
Celina jaitley : ममता कुलकर्णीनंतर ही अभिनेत्री तब्बल १४ वर्षांनी परतली भारतात; या कारणासाठी आली देशाची आठवण

गिरी दिनेश यांची चित्रपट कारकीर्द

गिरी दिनेश हे कन्नड चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते दिनेश यांचे पुत्र होते. त्यांनी त्यांच्या कारकिर्दीची सुरुवात बाल कलाकार म्हणून 'नन्ना मुदिना राणी' या चित्रपटातून केली. २००८ मध्ये, कन्नड सुपरस्टार दर्शनचा भाऊ दिनकर थुगुदीपा दिग्दर्शित 'नवग्रह' या ट्रान्सजेंडर चित्रपटात शेट्टीची भूमिका साकारून गिरी दिनेशला रातोरात लोकप्रियता मिळाली.

Giri Dinesh
Amitabh Bachchan: बिग बींचा साधेपणा, केबीसीमधील 'या' स्पर्धकाची शू-लेस बांधली; व्हिडीओ पाहून चाहते थक्क

'नवग्रह' हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर हिट झाला होता.

'नवग्रह' हा चित्रपट ७ नोव्हेंबर २००८ रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर प्रचंड हिट ठरला. काही दिवसांपूर्वी 'नवग्रह' देखील पुन्हा प्रदर्शित झाला. या चित्रपटाव्यतिरिक्त, गिरी दिनेश 'चमकैसी चिंदी उदासी' आणि 'वज्र' सारख्या चित्रपटांमध्ये दिसले होते. त्यांच्या अचानक निधनाने त्यांच्या चाहत्यांना धक्का बसला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com