Amitabh Bachchan: बॉलीवूडचे बिग बी अमिताभ बच्चन नेहमीच चर्चेत असतात. सध्या ते कौन बनेगा करोडपतीच्या १६ व्या सीझनचे सूत्रसंचालन करत आहे. अलीकडेच, शोच्या नवीनतम भागातला एक व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल होत आहे, यामध्ये तो एका तरुण स्पर्धकाच्या बुटांची लेस बिग बी बांधताना दिसत आहे. त्यांचा हा व्हिडीओ चाहत्यांना खूप आवडत आहे.
सोनी एंटरटेनमेंट टेलिव्हिजनच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर नुकताच एक व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. ज्यामध्ये अमिताभ बच्चन यांनी शोमध्ये आलेल्या एका स्पर्धकाच्या बुटांची लेस बांधू का म्ह्णून विचारले, त्यानंतर मुलीने हसून होकार दिला. शो दरम्यान, जेव्हा बिग बी त्या लहान मुलीला लेस बांधताना पाहतात, तेव्हा ते तिला विचारतो की तिने शू लेस स्वतः सोडले का? लेस सैल आहे का? यानंतर बिग बी तिला विचारतो की लेस बांधण्यासाठी कोणाला बोलावावे का, ती नकार देते, पण जेव्हा बिग बी विचारतात, "मी तुमचे शू लेस बांधू का?" यावर ती मुलगी लगेच हसून उत्तर देते आणि म्हणते, "हो, ते ठीक आहे."
या स्पर्धकाच्या बुटाची लेस बांधली
या नंतर जेव्हा अमिताभ बच्चन त्या मुलीच्या शूजची लेस बांधायला पुढे जातात तेव्हा ती बांधलेली लेस पुन्हा सोडते आणि बिग बी कडून शू लेस बांधून घेते त्यानंतर बिग बी यांना सांगते आता ही शू लेस कधीच निघणार नाही.
लोकांनी व्हिडीओवर प्रतिक्रिया दिल्या
हा व्हिडीओ शेअर करताना कॅप्शनमध्ये लिहिले होते की, जर अमिताभ बच्चन यांनी आमचे लेस बांधले असते तर आम्ही ते कधीही उघडले नसते. त्याचबरोबर या व्हिडिओवर अनेकांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका फॅनने लिहिले आहे की आता आयुष्यभर पावले योग्य दिशेने जातील. एकाने लिहिले की, अमिताभ बच्चन सर, तुमच्या या स्वभावामुळे तुम्ही जगभर लोकप्रिय आहात, देव तुम्हाला खूप आनंदी ठेवो.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.