Vicky Kaushal: 'घरोघरी मातीच्या चुली' मालिकेत होणार विकी कौशलची एन्ट्री? चाहत्यांना मिळणार मोठं सरप्राईज!

Vicky Kaushal In Gharoghari Matichya Chuli : स्टार प्रवाहवरील घरोघरी मातीच्या चुली मालिकेत अभिनेता विकी कौशल हजेरी लावणार आहे. विकी जानकी आणि हृषिकेशसोबत छावा या चित्रपटाचं प्रोमोशन करणार आहे.
Vicky Kaushal In Gharoghari Matichya Chuli
Vicky Kaushal In Gharoghari Matichya ChuliSaam Tv
Published On

Vicky Kaushal In Gharoghari Matichya Chuli : विकी कौशलचा 'छावा' चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहे. चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाल्यापासून चाहते या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत. या निमित्ताने चित्रपटाचे जोरदार प्रोमोशन सुरु आहे. विकी आणि अन्य कलाकार अनेक मुलाखतींमध्ये चित्रपटाशी निगडित विविध किस्से प्रेक्षकांना सांगत आहेत. पण आता लवकरच विकी कौशल एका मराठी मालिकेत हजेरी लावणार आहे.

'छावा' चित्रपटाच्या प्रोमोशनचा भाग म्ह्णून अभिनेता विकी कौशल स्टार प्रवाह वाहिनीवरील 'घरोघरी मातीच्या चुली' या मालिकेत विशेष अतिथी म्ह्णून हजेरी कावून प्रेक्षकांचे मनोरंजन करणारा आहे. विकी हा मुंबईतील मालाड येथील चाळीत जन्माला आला आणि तिथेच तो मोठा झाला त्यामुळे त्याच्यामानात मराठी भाषा, मराठी संस्कृती आणि छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल विशेष प्रेम आणि आदर आहे. त्यामुळे त्याचे या मराठी मालिकेत हजेरी लावणे प्रेक्षकांना नक्कीच आवडेल.

Vicky Kaushal In Gharoghari Matichya Chuli
Sayali Sanjeev: सायली संजीवचं पूर्ण नाव तुम्हाला माहिती आहे का?

राजश्री मराठीने त्यांच्या इंस्टाग्राम पोस्टद्वारे ही माहिती प्रेक्षकांना देत, 'छावा' सिनेमाच्या निमित्ताने 'घरोघरी मातीच्या चुली' मालिकेच्या सेटवर विक्की कौशलने लावली खास हजेरी!' हे कॅप्शनमध्ये लिहिले. या पोस्टवर चाहत्यांच्या अनके कौतुकास्पद कमेंट येत आहेत. एका नेटकाऱ्याने लिहिले 'सुपरहिट कॅमिओ' दुसऱ्याने लिहिले 'सुपर' अशा विविध प्रेमळ कमेंट पाहायला मिळत आहेत.

Vicky Kaushal In Gharoghari Matichya Chuli
Sonu Sood: फसवणूक प्रकरणात जारी केलेल्या अटक वॉरंटवर सोनू सूदची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला...

विकी कौशलचा 'छावा' हा चित्रपट छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनावर शिवाजी सावंत यांच्या 'छावा' या कादंबरीवर आधारित आहे. या चित्रपटात रश्मिका मंदाना महाराणी येसूबाईंची भूमिका साकारणार आहे. तर अक्षय खन्ना क्रूर औरंगजेबाची भूमिका साकारणार आहे. हा चित्रपट १४ फेब्रुवारी रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. तसेच, स्टार प्रवाह वाहिनीवर 'घरोघरी मातीच्या चुली' ही मालिका सोमवार ते शनिवार सायंकाळी ७.३० वाजता प्रसारित होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com